जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:40 PM2020-12-02T17:40:18+5:302020-12-02T17:45:05+5:30

Coronavirus, statetransport, vaibhavnaik, kankavli, sindhudurgnews जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

Take care not to inconvenience the citizens of the district! | जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!

कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची भेट घेऊन चर्चा केली.

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!वैभव नाईक यांची सूचना; एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक, वाहकांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे . असे असताना काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत . यापुढे जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्हयातील एसटी वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवणचे नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , एस . एस . नाडकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

यावेळी कोरोनाच्या संकटापूर्वी सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या ४०० शेड्युल व १८०० फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी २७५ शेड्युल व १३१७ बसफेऱ्या आता सुरु झाल्या आहेत . १ डिसेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांना पास देणे चालू करण्यात आले आहे . मुंबई , ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक , वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत , अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .

त्यावर जिल्हयातून प्रत्येक आगारातून सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांबाबतची माहिती वृत्तपत्रात द्या. तसेच बसस्थानकांवर दर्शनी भागात त्यांची माहिती लावण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या . तसेच प्रत्येक आगाराचा संपर्क नंबरही तिथे देण्यात यावा , असे स्पष्ट केले . यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६० टक्केहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे रसाळ यांनी सांगितले .
जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत . ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी रसाळ यांनी सांगितले.

कोणीही राजकारण करू नये !

मुंबई , ठाणेहून आलेल्या चालक , वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये , तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्यादृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये . एसटीचे उत्पन्न वाढीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले .
 

Web Title: Take care not to inconvenience the citizens of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.