शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ठेकेदारावर कारवाई करा; अन्यथा उपोषण :मंगेश लोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 5:32 PM

vaibhavwadi PanchyatSamiti Sindhudurg- सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आपणास उपोषणास बसावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत दिला.

ठळक मुद्देठेकेदारावर कारवाई करा; अन्यथा उपोषण :मंगेश लोके एडगावच्या अपूर्ण नळयोजनेवरून सभेत दिला इशारा

वैभववाडी : सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आपणास उपोषणास बसावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत दिला.सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, सदस्या हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम २०१३ मध्ये मंजूर होऊन त्याचवेळी सुरूही झाले. परंतु सुरुवातीचे काही काम केल्यानंतर वेळकाढू धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ते काम सात वर्षे अपूर्णावस्थेत आहे. लाखोंचा निधी मंजूर असूनही एडगाव पवारवाडीतील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजमितीस सुटू शकलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली.घरबांधणी परवानगीचा मुद्दा उपसभापती रावराणे यांनी उपस्थित केला. नगरपंचायत कार्यक्षेत्रात घरबांधणी परवाना मिळविताना नागरिकांना घाम फुटतो. किमान ग्रामपंचायत क्षेत्रातील परवानगी प्रकिया सुटसुटीत असायला हवी, असे सांगितले. त्यावर परब यांनी, १५०० स्क्वेअर फूट बांधकाम परवानगीचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतींना दिले आहेत. अकृषक अटही रद्द केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सूचनाएडगावच्या अपूर्ण नळ योजनेसाठी मंगेश लोके यांनी उपोषणाचा इशारा देताच गटविकास अधिकारी परब यांनी, ज्या ठेकेदारामुळे हे काम रखडले आहे, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी सूचना केली. त्यामुळे खरंच अशी कारवाई होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.कोरोना वाढतोय; सतर्कता बाळगावीकोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केलेले आहे. आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पूर्वीप्रमाणे तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सभापती डाफळे यांनी केले.

टॅग्स :vaibhavwadiवैभववाडीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग