स्वामी समर्थांच्या पादुकांचे स्वागत, कुडाळ परिसरात भक्तिमय वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:17 IST2020-01-03T17:16:07+5:302020-01-03T17:17:11+5:30
कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले. अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पालखी गुरुवारी सकाळी वेंगुर्ल्याहून कुडाळ येथे आली.

कुडाळ बाजारपेठेतून भक्तिमय वातावरणात भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीची मिरवणूक काढली.
कुडाळ : कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले.
अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पालखी गुरुवारी सकाळी वेंगुर्ल्याहून कुडाळ येथे आली.
कुडाळ येथील औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी मठात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या पालखीची कुडाळ पोस्ट आॅफिस, एसटी स्टँड, बाजारपेठमार्गे महालक्ष्मी हॉल अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ती पालखी पावशी येथील विनायक केसरकर यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ भाविकांनी घेतला.