शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यातील विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:29 IST

Panchyatsamiri, Kankavli School, panchayat samiti, sindhudurg शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही !कार्यवाही न करण्याचा पंचायत समितीचा निर्णय : दिलीप तळेकर

कणकवली : शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली.

प्राथमिक शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिले जात असताना शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात आहे . माध्यमिक शाळा सुरू करताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत वेगळा न्याय का ? पालक , विद्यार्थी भेटी वेळी विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास त्याला जबाबदार कोण ? अशी भूमिका  तळेकर यांनी स्पष्ट केली.कणकवली येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपसभापती दिव्या पेडणेकर , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर , पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री , ओटव सरपंच हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते.यावेळी दिलीप तळेकर म्हणाले, शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थित ठेवणे योग्य आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, तालुक्यातील सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्यानंतरच पालकांशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत संवाद साधावा. तसेच जोपर्यंत शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये .

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत.लॉकडाऊन काळात कणकवली तालुक्यात २३ जूनला ' शिक्षण आपली दारी ' हा उपक्रम पंचायत समितीने राबविला होता .तो उपक्रम ७ ऑक्टोबरला थांबविला आहे.आता शासन निर्णयानुसार शाळेमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थिती असायला हवी . त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही.मात्र, तेच शिक्षक विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करत आहेत . कणकवली तालुक्यात ८ दिवसात ५ शिक्षक बाधित मिळाले आहेत .त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले आहे की , विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी प्रथम पालकांनाही संपर्क साधावा.यापूर्वी शासन निर्णय देखील तसाच आहे . तरीही विद्यार्थ्याच्या घरी जाण्याची सक्ती केली जात असल्याचे तळेकर यांनी सांगितले .नागरिकांनी काळजी घ्यावी !कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन दिलीप तळेकर यांनी यावेळी केले. 

 

 

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली