शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : विद्यार्थ्याची कर्ली नदीत आत्महत्या, नेरुर येथील घटना : आत्महत्येचे कारण अस्पष्ट; शुक्रवारपासून होता बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:28 IST

कुडाळ तालुक्यातील नेरूर कुलदेवता मंदिरनजीक राहणारा बारावीत शिकणारा विद्यार्थी रोहित चंद्रशेखर नाईक (१८) याने नेरूरपार येथे कर्ली नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्याची कर्ली नदीत आत्महत्या, नेरुर येथील घटना आत्महत्येचे कारण अस्पष्टरोहित नाईक उत्कृष्ट कबड्डीपटू, शुक्रवारपासून होता बेपत्ता

चौके : कुडाळ तालुक्यातील नेरूर कुलदेवता मंदिरनजीक राहणारा बारावीत शिकणारा विद्यार्थी रोहित चंद्रशेखर नाईक (१८) याने नेरूरपार येथे कर्ली नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या जयश्री वामन प्रभू कनिष्ठ महाविद्यालयात रोहित नाईक हा बारावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. काही स्थानिकांना रोहीत हा शुक्रवारी सकाळी नेरूरपार पुलावर घुटमळताना दिसला होता.

तो शाळेतही गेला नाही. आणि घरीही परतला नाही. त्यामुळे सायंकाळनंतर शोधाशोध करण्यात आली. गेले तीन-चार दिवस तो शाळेत गैरहजर होता. फक्त काळसे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनादिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात तो शाळेत आल्याचे शिक्षकांनी सांगितले.

शुक्रवार ५ रोजी दुपारी २ वाजता कॉलेज ठेवण्यात आले होते. परंतु रोहित हा सकाळी ७ वाजताच कॉलेजचा गणवेश घालून आणि दप्तर घेऊन घरातून बाहेर पडला. परंतु तो कॉलेजला न येता त्याने नेरूरपार पुलावरून कर्ली नदीपात्रात उडी मारून आपले जीवन संपविले.

शनिवारी सकाळपासून कर्ली नदीत बोटीच्या सहाय्याने स्थानिक तरूणांनी शोध मोहीम राबविली असता सकाळी नेरूरपार पुलानजीक नदीत रोहितचे दप्तर पाण्यावर तरंगताना सापडले. त्यानंतर शोध घेतला त्यावेळी पुलाच्या खालच्या बाजूला काही मीटर अंतरावर सरंबळ हद्दीत रोहितचा मृतदेह सापडला.

बोटीच्या सहाय्याने शोध घेणारे काळसे ग्रामपंचायत सदस्य सचिन सावंत, महेश हडकर आणि स्थानिक तरूणांनी दुपारी सव्वा एक वाजता मृतदेह दोरीच्या सहाय्याने नेरूरपार जेटीनजीक आणला.

पोलीस पाटील गणपत मेस्त्री यांनी कुडाळ पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती दिली. काळसे सरपंच केशव सावंत, काळसे हायस्कूलच्या संस्था चेअरमन अर्चना प्रभू, मुख्याध्यापक के. जी. वालावलकर आणि शिक्षकांनी शोध मोहीमेदरम्यान घटनास्थळी भेट दिली.रोहित नाईक उत्कृष्ट कबड्डीपटूउत्कृष्ट कबड्डीपटू असणाऱ्या रोहित नाईक याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे भगवान चव्हाण आणि हिपकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालय कुडाळ येथे पाठविण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस