स्मार्ट फोन न दिल्याने अमरावतीत तरुण मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:34 PM2018-01-03T15:34:44+5:302018-01-03T15:35:05+5:30

आई-वडिलांकडून स्मार्ट फोनचा हट्ट पुरविला न गेल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

In spite of not giving a smart phone, young boy tried suicide in Amravati | स्मार्ट फोन न दिल्याने अमरावतीत तरुण मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

स्मार्ट फोन न दिल्याने अमरावतीत तरुण मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपोलिसांनी वाचवले प्राण

आॅनलाईन लोकमत
अमरावती : आई-वडिलांकडून स्मार्ट फोनचा हट्ट पुरविला न गेल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अल्पवयीनाविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
फे्रजरपुरा हद्दीतील १६ वर्षीय मुलाने सोमवारी रात्री आई-वडिलांकडे स्मार्ट फोनची हट्ट धरला होता. आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर त्याने घरातच गोंधळ घातला. यानंतर त्याने एका बंद खोलीत छताला दोरी बांधून गळ्याला फास लावला. तो ऐकत नसल्याचे पाहून फे्रजरपुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्परता घटनास्थळ गाठून मुलाचे प्राण वाचविले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि आई-वडिलांसह त्याचे ठाण्यात समुपदेशन केले. मंगळवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथेही समुपदेशन करण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आधुनिक युगात मुलांचा हट्ट कोणत्या स्तरावर पोहोचला आहे व आई-वडिलांना अगतिकतेच्या कुठल्या पातळीवर आहेत, हे या घटनेने स्पष्ट केले आहे.

Web Title: In spite of not giving a smart phone, young boy tried suicide in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.