शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:32 IST

Corona vaccine Malvan Sindhudurg-मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी कोविड लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २ हजार ३८४ जणांनी कोविड लस घेतली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करीत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे, अशा सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देकोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करामहेश कांदळगावकर : व्यापारी, नागरिकांना आवाहन

मालवण : मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी कोविड लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २ हजार ३८४ जणांनी कोविड लस घेतली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करीत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे, अशा सूचना केल्या आहेत.शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविडसदृश लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तपासणी करून घ्यावी. जे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जे निर्बंध घातले आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे.शहरात अनेक व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी संघाने याबाबत सर्व व्यापार्‍यांचे विक्रेत्यांचे प्रबोधन करावे. कोरोनाचा प्रसार वाढल्यास प्रशासनास कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याचा परिणाम व्यवसायांवर होऊ शकतो. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापार्‍यांनी पुन्हा घरपोच सामान पोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन कांदळगावकर यांनी केले आहे.गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाच्यावतीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिक, व्यापार्‍यांचे याला चांगले सहकार्य लाभले. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाईल. तसेच पालिकेत अत्यावश्यक काम असल्यासच नागरिकांनी यावे, असेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग