शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

सातुळी-बावळाटला वादळाचा फटका

By admin | Updated: October 17, 2014 23:53 IST

लाखोंचे नुकसान : अनेक घरांवर झाडे कोसळली; पावसाने भातशेती धोक्यात

ओटवणे : ओटवणे दशक्रोशीतील सातुळी- बावळाट या गावांना दुपारी मुसळधार वृष्टीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. दुपारी तीन वाजता केवळ दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे बावळाट-मुलांडावाडी येथील उत्तम ठाकूर यांचे राहते घर, दुकान यावर दोन भले मोठे माड कोसळल्याने घर व दुकानांची पडझड होऊन सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. काही घरांच्या पडझडीचे प्रकार घडल्याने लाखोंची हानी झाली आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बावळाट- मुलांडावाडी येथील पार्वती राऊळ, गंगाबाई परब यांच्या घरांवर व शेत मांगरावर शिवन व फणसाचे झाड पडल्याने व वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही भेगा पडून नुकसान झाले. सातुळी-बावळाट येथील पोलीसपाटील अरुण परब यांच्या घराचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. जगन्नाथ परब, विजय परब, प्रवीण परब यांची वैयक्तिक मालकीची झाडे कोसळली व घरांवरही पडली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या वादळामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नुकसान ग्रामस्थांना सोसावे लागले. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पंचायत समितीचे सदस्य राघोजी सावंत, बावळाटचे सरपंच सूर्यकांत परब, उपसरपंच प्रभावती कानसे, पोलीसपाटील आबा परब, कांता पांगम, तलाठी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कणकवली परिसरात मेघगर्जनेसह पाऊसनवरात्रौत्सवानंतर गायब झालेल्या पावसाने आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. त्यामुळे भातकापणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दहा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यात कणकवली टेंबवाडीनजीक एका घरावर वीज पडली होती. पावसाळी हंगामातील भातशेती सध्या कापणीला योग्य आहे. त्यातच निवडणूकही आटोपल्याने शेतकरी सध्या भातकापणीमध्ये मग्न आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आॅक्टोबर हिट जाणवत असल्याने उशिरा लावणी केलेली भातशेतीही कापणीस योग्य झाली आहे. मात्र, अचानक कापणी करून ठेवलेल्या अथवा कापणीस योग्य असलेल्या भातरोपांवर पडत असलेल्या पावसाने पाणी पडून भाताची केसर झडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.