शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

कचरा समुद्रकिनारी टाकल्याने दुर्गंधी : देवगड येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:21 IST

देवगडच्या कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने कचरा टाकत असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत कचरा उचलत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देकचरा समुद्रकिनारी टाकल्याने दुर्गंधी : देवगड येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलनशहरातील समस्या, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

देवगड : देवगडच्या कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने कचरा टाकत असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत कचरा उचलत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले.देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने गोळा करण्यात येत असलेला कचरा पवनचक्कीनजीक समुद्रकिनारी टाकण्यात येत असल्याने या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले. यावरून शिवसेना, भाजपा नगरसेविका हर्षा ठाकूर व देवगडमधील सामाजिक कार्यकर्ते यांनी कचरा टाकत असलेल्या ठिकाणी जात ठिय्या आंदोलन छेडले.गुरुवारी सकाळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, शिवप्रसाद पेडणेकर, राजू पाटील, आशिष लोके, दीपक घाडी आदींनी नगरपंचायत कचरा टाकत असलेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी टाकण्यात आलेला कचरा पवनचक्की परिसरात सर्वत्र पसरलेला होता.यावेळी मुख्याधिकारी गव्हाणे यांनी या परिसरात नगरपंचयतीमार्फत कचरा टाकला जात आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही, असे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गव्हाणे यांनी कर्मचाऱ्यांनाही तत्काळ कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा अशा सूचना दिल्या.

पवनचक्की परिसरातील जागा महावितरणची असल्याने उपअभियंता जयकुमार कथले यांनाही बोलाविण्यात आले. त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी नगरपंचायत कारभाराविरोधात हातात फलक घेत घोषणाबाजी केली व त्या परिसरातच ठिय्या आंदोलन छेडले.मुख्याधिकारी धारेवरनगरपंचायत नागरिकांकडून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घेते. प्रत्यक्षात हाच कचरा एकाच ठिकाणी टाकून दुर्गंधी पसरविण्याचे काम करीत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कचरा टाकत असतानाच नगपंचायत गाडीला रंगेहाथ पकडून कचरा टाकण्यापासून त्यांनी रोखले. तसेच मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेत धारेवर धरले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नsindhudurgसिंधुदुर्ग