शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत उद्यापासून राज्यस्तरीय 'बॉक्सिंग अजिंक्यपद' स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:39 IST

स्पर्धेतील विजेते चेन्नई येथे ५ जुलै पासून होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

कणकवली : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशन आयोजित ८० वी पुरुष व १८ वी युवा महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २२  ते २८ जून या कालावधीत कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत ३५० ते ४०० बॉक्सर, पंच व प्रशिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशनचे सचिव डॉ. राजाराम दळवी यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  महाराष्ट्र रेफरी समितीचे चेअरमन व तांत्रिक अधिकारी (मुख्य) राजन जोथाडी,  महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष दळवी, खजिनदार कृष्णा मातेफोड, सदस्य एकनाथ चव्हाण, नरेंद्र सावंत, विजय घरत, संतोष गुराम, श्रीकृष्ण आजगावकर, सर्वेश दळवी, रुपेश दळवी आदी उपस्थित होते.दळवी म्हणाले, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश  राणे यांच्या हस्ते होईल. तर स्पर्धेचा समारोप सोहळा २८ जून रोजी सायंकाळी ३ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे , सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशनचे अध्यक्ष अभिमन्यू रासम तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  विजेते चेन्नई येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारही स्पर्धा वजनी गटात खेळविली जाणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेते चेन्नई येथे ५ जुलै पासून होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचा लाभ सिंधुदुर्गातील क्रीडा रसिकांनी घ्यावा ,असे आवाहनही डॉ.राजाराम दळवी यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग