शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रॉक गार्डनमध्ये प्रवेश कर आकारणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:51 IST

Malvan beach tourism sindhudurg-पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डन येथे म्युझिक फाऊंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत चालला असून गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या पाच रुपयांत गार्डनमध्ये फेरफटका मारता येणार आहे.

ठळक मुद्दे नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत निर्णय पर्यटकांची पसंती रॉक गार्डनलाच !

मालवण : पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डन येथे म्युझिक फाऊंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत चालला असून गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या पाच रुपयांत गार्डनमध्ये फेरफटका मारता येणार आहे.मालवण नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी शुक्रवार (दि. २५)पासून करण्यात आली आहे. यात प्रत्येकी पाच रुपये कर घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असणाऱ्या मालवण शहरात नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रॉक गार्डनला अलीकडच्या काही वर्षांत पर्यटक मोठी पसंती देत आहेत.समुद्रकिनारी खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुलझाडांनी बहरलेल्या या गार्डनमध्ये नगरपालिकेने रंगीबेरंगी एलईडी लाईट, हायमास्ट मनोरे, छोटेखानी तलाव, मुलांसाठी खेळणी उभारून गार्डनच्या सौंदर्यात भर घातली. कलरफुल लाईट आणि म्युझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे कारंजे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे.प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश फी घेणारसायंकाळी सूर्यास्ताचा नजारा आणि फाऊंटनचा आनंद लुटण्यासाठी सध्या गार्डनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. रॉक गार्डन देखभाल व दुरुस्तीसाठी दोन वर्षांसाठी ९५ हजार रुपये खर्च होणार आहे. मालवण नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका असल्याने गार्डनच्या देखभाल-दुरुस्तीचा आर्थिक बोजा नगरपालिकेवर पडतो; म्हणून नाममात्र प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश फी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग