शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:49 IST

धडकेत नळयोजनेची पाइपलाइन फुटली

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : धाराशिव येथून शैक्षणिक सहलीसाठी सिंधुदुर्गात आलेली एसटी बस खाकशीमार्गे कुणकेश्वरकडे जाताना खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाइपलाइनला धडकली. अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.बसमध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. मात्र, बसमधील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच, स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तत्काळ देवगड आगाराच्या बसची आणि चालकाची व्यवस्था करून शालेय सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सहलीच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले.

धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशीमार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र, खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली.सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाइपलाइन असल्याने त्या पाइपलाइनला जाऊन धडकली. मात्र, एसटीच्या धडकेने पाइपलाइन फुटून पाणी रस्त्यावर आले. अपघाताची भीषणता एवढी होती की, पाइपलाइनचे दोन तुकडे झाले आणि नळयोजनेच्या जॉइंटला तडे गेले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdharashivधाराशिवAccidentअपघातStudentविद्यार्थी