देवबाग-येथे एसटी बसला अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 5, 2022 19:12 IST2022-09-05T19:11:49+5:302022-09-05T19:12:09+5:30
मालवण ( सिंधुदुर्ग ) : मालवणहून देवबागला जाणारी एसटी बस उताराच्या रस्त्यावर घसरल्याने रस्त्यालगतच्या दगडी कुंपणास आदळून अपघात झाला. ...

देवबाग-येथे एसटी बसला अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही
मालवण (सिंधुदुर्ग) : मालवणहून देवबागला जाणारी एसटी बस उताराच्या रस्त्यावर घसरल्याने रस्त्यालगतच्या दगडी कुंपणास आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघात सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान घडला.
मालवण आगारातून सुटणारी मालवण-देवबाग एसटी बसफेरी स्कुबा डायव्हिंग सेंटर नजीकच्या उतारावरून देवबाग येथे जात असता पेडणेकरवाडी येथे बस अचानक घसरली आणि लगतच्या दगडी कुंपणाला आदळली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी आगाराचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.