शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अवैध प्रवासी वाहतुकीचे एसटीला ग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:58 IST

StateTransport- राज्य परिवहन महामंडळ स्थापन होवून वीस वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सन १९६८ -६९ ते १९८७-८८ ही वर्षे एसटीच्या उत्कर्षाची गेली. मात्र, सन १९८८ - ८९ मध्ये मोटारवाहन कायद्यात बदल होऊन पर्यटनाचे परवाने मुक्तपणे देण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देपर्यटनाचे मुक्त परवाने दिल्याने स्थितीशासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम

सुधीर राणे

कणकवली : राज्य परिवहन महामंडळ स्थापन होवून वीस वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सन १९६८ -६९ ते १९८७-८८ ही वर्षे एसटीच्या उत्कर्षाची गेली. मात्र, सन १९८८ - ८९ मध्ये मोटारवाहन कायद्यात बदल होऊन पर्यटनाचे परवाने मुक्तपणे देण्यास सुरुवात झाली.

अशा स्थितीत खासगी बसेस सर्रासपणे टप्पे वाहतूक करू लागल्या . परवान्याच्या अटींचे पालन न करता अवैध प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी आर्थिक खाईत लोटली गेली.शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे एसटीचा होणारा विस्तार रोखला गेला. त्याचा परिणाम म्हणजे ' प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाला वाढत्या प्रवाशांची सोय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

सन १९८८- ८९ ते २००५-०६ या कालावधीत एसटीने वाढत्या प्रवाशांच्या अपेक्षांची नोंद घेऊन महामंडळाची सेवा समाजाभिमुख व प्रवासीभिमुख करण्याच्या हेतूने विविध योजना अंमलात आणल्या. त्याचाही उपयोग उत्पन्न वाढीसाठी झाला.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाणे दिलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर जानेवारी २००२ पासून बंदी आणण्याच्या निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी शासनस्तरावर अजूनही झालेली नाही .या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे दरवर्षी सुमारे २ हजार कोटींचे उत्पन्न महामंडळास मिळत नाही. शिवाय शासनास कर रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. प्रवासी करापोटी सन १९५८-५९ पासून २०१९-२० पर्यंत सुमारे १५ हजार १६६ कोटी १३ लाख इतकी रक्कम महामंडळाने शासनास दिली आहे.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रवासी कर १७.५ टक्के असून डिझेल वरील राज्य व केंद्राचा अधिभार सर्वाधिक आहे. पथ कराचा वार्षिक बोजा १६० कोटी असून सामाजिक बांधीलकीमुळे दुर्गम तसेच खिफायतशीर नसलेल्या मार्गावर दिलेल्या सेवेमुळे वार्षिक सुमारे १ हजार कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. त्याचा फटका एसटीच्या एकंदर सेवेवर होत आहे.प्रशासनाने प्रवासी , कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी !लोकांची जीवनवाहिनी बनलेल्या एसटीचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होता नये. तसे झाले तर कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर आज हक्काने प्रवासी एसटीच्या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यावरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारे एसटीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

वेळ प्रसंगी संघर्षाची भूमिकाही घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जी भूमिका घेतली आहे तिला आम्ही चांगला प्रतिसाद देत आहोत. पण प्रशासनाने देखील कर्मचारी व प्रवाशांची काळजी घेणे आवश्यक आहे.- अशोक राणे ,विभागीय अध्यक्ष , इंटक संघटना.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग