कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:00 IST2021-06-09T11:59:47+5:302021-06-09T12:00:37+5:30
KonkanRailway Fire Sindhudurg : कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ इलेक्ट्रीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला बुधवारी सकाळी ९ .३० वाजण्याच्या सुमारास आग लागली.

कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग
कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ इलेक्ट्रीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला बुधवारी सकाळी ९ .३० वाजण्याच्या सुमारास आग लागली.
तेर्सेबांबर्डे गेट जवळ इलेक्ट्रीकचे काम चालू असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या बोगीला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरूस्ती साहित्याचे नुकसान झाले आहे . कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह , जनशताब्दी , मांडवी एक्स्प्रेस या रेल्वे अडकून पडल्या असून कोकण वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे .