शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पावसाळ्यापूर्वी कणकवलीतील सांडपाण्याची समस्या मार्गी लावा, ठेकेदाराला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 1:56 PM

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही घरात गटारातील पाणी गेले तर नागरिकांच्या उद्रेकाला महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला .

ठळक मुद्दे पावसाळ्यापूर्वी कणकवलीतील सांडपाण्याची समस्या मार्गी लावा, ठेकेदाराला निर्देश अन्यथा, नागरिकांच्या उद्रेकाला तेच जबाबदार राहतील, नगरसेवकांचा इशारा

कणकवली : पावसाळा सुरू होण्यापूर्वी कणकवली शहरातील सांडपाणी व्यवस्थेची समस्या मार्गी लावा, असे निर्देश कणकवली नगरसेवकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही घरात गटारातील पाणी गेले तर नागरिकांच्या उद्रेकाला महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला .कणकवलीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, मेघा गांगण, अ‍ॅड.विराज भोसले आदींनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी तसेच दिलीप बिल्डकॉन कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत शहरातील महामार्ग चौपदरीकरण काम तसेच गटार व्यवस्थेची पाहणी केली .शहरातील एसटी वर्कशॉप, उबाळे मेडिकल, अ‍ॅड. उमेश सावंत निवासस्थान, अप्पासाहेब पटवर्धन चौक, गांगोमंदिर, स्टेट बँक समोरील परिसरातील नाला येथे सांडपाणी साचून राहण्याची समस्या निर्माण होते. त्यातच शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी बिकट अवस्था निर्माण होते .३१ मे पूर्वी समस्यांचे निराकरण होईलनागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण होतो. यावर्षी ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी पुढील आठ दिवसांत उपाययोजना करा. यात दिरंगाई झाली तर आम्ही जबाबदार नाही असा इशारा देखील उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि बंडू हर्णे यांनी यावेळी दिला.

यावेळी ३१ मे पूर्वी कणकवली शहरातील सर्व समस्यांचे निराकरण होईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्याची माहिती नगरसेवक संजय कामतेकर यांनी दिली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग