दाभोळेत बांधले ६ वनराई बंधारे, ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:50 PM2017-11-16T16:50:40+5:302017-11-16T16:51:24+5:30

देवगड : दाभोळे ग्रामपंचायतीच्या वतीने दाभोळे गावामध्ये ६ वनराई बंधारे पहिल्या टप्यामध्ये बांधण्यात आले आहेत.

Six forest bunds built in Dabhol, and the ideal work of Gram Panchayat | दाभोळेत बांधले ६ वनराई बंधारे, ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

दाभोळेत बांधले ६ वनराई बंधारे, ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

googlenewsNext

देवगड : दाभोळे ग्रामपंचायतीच्या वतीने दाभोळे गावामध्ये ६ वनराई बंधारे पहिल्या टप्यामध्ये बांधण्यात आले आहेत. या बंधा-यांची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केली असून, या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन असेच बंधारे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी बांधावे असे त्यांनी सांगितले.

देवगड तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतीमध्ये ९०० वनराई व कच्चे बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. दाभोळे ग्रामपंचायतीला १६ बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामधील ६ वनराई बंधारे बुधवारी बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. दाभोळे गावातील महिला बचतगट, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणासाठी बांधण्यात आले आहेत.
या बंधा-यांची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कमलाकर रणदिवे, देवगड सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, उपसभापती संजय देवरुखकर, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता घाडी, विस्तार अधिकारी शिंदे तसेच जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत म्हणाल्या की, देवगड तालुक्यातील सर्वप्रथम वनराई बंधारे बांधण्याचा मुहूर्त दाभोळे ग्रामपंचायतीने केला असून, अतिशय नियोजनबद्ध बंधा-यांचे काम केले आहे. हजारो लिटर पाणी अडवून या गावातील भविष्यात होणारी पाणीटंचाई नक्कीच या बंधा-याने रोखली जाऊ शकते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आलेले दाभोळे गावातील हे बंधारे देवगड तालुक्यातील नक्कीच आदर्श ठरून इतर गावातीलही बंधारे अशाच स्वरूपाचे बांधण्यात यावेत, असे सांगण्यात आले. यावेळी दाभोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रदीप नारकर यांच्या पुढाकाराने व नियोजनबद्ध बंधारे बांधण्याचे नियोजन केल्याने योग्य पद्धतीने बंधारे बांधण्यात आले आहेत.

१६ बंधा-यांचे उद्दिष्ट
यावेळी बोलताना ग्रामसेवक नारकर म्हणाले की, दाभोळे गावात भविष्यात पाणीटंचाई होता कामा नये. तसेच बंधारे बांधून अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी तसेच पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी होणार आहे. याचा फायदा हा दाभोळे गावातील ग्रामस्थांनाच होणार आहे. तालुकास्तरावरून दाभोळे ग्रामपंचायतीला १६ बंधा-यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ६ बंधारे बांधण्यात आले आहेत. उर्वरित १० बंधारेही काही दिवसांत बांधण्यात येणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.

हे बंधारे बांधण्यासाठी दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान समन्वयक बांदेकर, गावातील जिल्हा प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: Six forest bunds built in Dabhol, and the ideal work of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.