मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 9, 2023 17:17 IST2023-12-09T17:17:10+5:302023-12-09T17:17:28+5:30
चार जणांचे मृतदेह सापडले. एकाला वाचवण्यात यश. एकजण बेपत्ता

मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या
देवगड ( सिंधुदुर्ग) : पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. देवगड समुद्रात उतरले असताना सहा जण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. यातील चार जणांचे मृतदेह सापडले. यातील एकाला वाचवण्यात यश आले. अद्याप एकजण बेपत्ता आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी चारही मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर आकाश तुपे असे वाचवण्यात यश आलेल्याचे नाव आहे. तर राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
अतिउत्साहामुळे दुर्घटना
देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित किनारा म्हणून ओळख आहे. मात्र आग आणि पाण्याशी कोणी खेळ करू नये असे म्हणतात ते योग्यच आहे. यामुळे अतिउत्साही पर्यटक जीव गमावून बसतात. काही जण खोल समुद्रात जातात आणि मग मोठ्या लाटांमध्ये अडकतात आणि बुडतात.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात मोठी घटना
आतापर्यंत समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वात मोठी घटना म्हणून देवगडच्या या घटनेकडे पाहिले जाईल. आतापर्यंत तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर येथे अशा घटना घडल्या आहेत. देवगड समुद्रात अशी पहिलीच मोठी घटना आहे.