शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सहा सभापती कॉँग्रेसचे

By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST

दोडामार्ग, वेंगुर्लेत बाचाबाची : दोडामार्गात भाजप, वेंगुर्लेत केसरकर गटाचा सभापती

कणकवली : आठपैकी सहा पंचायत समित्यांच्या सभापतिपदी कॉँग्रेसचे सदस्य विराजमान झाले. नाट्यपूर्ण घडामोडीत दोडामार्गात भाजपचा सभापती निवडला गेला. काल, शनिवारी रात्री दोडामार्गात झालेल्या पक्षबदलाने सभापती निवडीवेळी राडा झाला. सावंतवाडीत काढण्यात आलेला ‘ड्रॉ’ कॉँग्रेसला ‘लकी’ ठरला, तर वेंगुर्लेत केसरकर गटाला कौल मिळाला. दरम्यान, वेंगुर्लेतही निवडीदरम्यान सदस्य, कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली.कणकवली पंचायत समिती सभापतिपदी आस्था सर्पे, तर उपसभापतिपदी भिवा वर्देकर यांची बिनविरोध निवड झाली. वैभववाडीच्या सभापतिपदी वैशाली रावराणे, उपसभापतिपदी शोभा पांचाळ, मालवणच्या सभापतिपदी सीमा परुळेकर, तर उपसभापतिपदी देवानंद चिंदरकर यांची निवड झाली. सावंतवाडी सभापतिपदी कॉँग्रेसचे प्रमोद सावंत, तर उपसभापतिपदी महेश सारंग यांना लॉटरी लागली. दोडामार्गात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले महेश गवस यांची सभापतिपदी, तर उपसभापती म्हणून आनंद रेडकर बिनविरोध निवडून आले. कुडाळमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा घावनळकर यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र ऊर्फ आर. के. सावंत यांची निवड करण्यात आली. देवगडमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. मनोज सारंग यांची सभापतिपदी, तर स्मिता राणे यांची उपसभापतिपदी निवड झाली. दोडामार्गात राडादोडामार्गात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासह चौघांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. काल, शनिवारीच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले महेश गवस यांची सभापतिपदी, तर उपसभापती म्हणून आनंद रेडकर यांची बिनविरोध निवड झाली. नाराज शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कुडाळमध्ये राष्ट्रवादीने कॉँग्रेसशी हातमिळवणी केली असल्याने निवडणुकीवर शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला.सावंतवाडी, वेंगुर्लेत चिठ्ठीसावंतवाडी पंचायत समितीत कॉँग्रेस आणि शिवसेनेचे समसमान संख्याबळ झाल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. कॉँग्रेस सभापती व उपसभापती पदांच्या चिठ्ठीत दोन्ही वेळा लकी ठरले. वेंगुर्लेतील निवडीत टाकण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दीपक केसरकर गटाच्या सुचिता वजराठकर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे स्वप्निल चमणकर यांची उपसभापतिपदी निवड झाली. दोन्ही गटांतील बलाबल समान झाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. निवडीनंतर काही वेळातच पंचायत समितीसमोर दोन्ही गटांत शाब्दिक खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)