शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे खड्ड्यांनी घेतला बहिणीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:25 IST

खड्डे बुजविण्याची मागणी

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील राणे स्टॉपजवळ दुचाकी चालकाचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे ताबा सुटून झालेल्या अपघातात येथील सेलीना जॉन फर्नांडिस (२८, रानबांबुळी) या युवतीचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जोसेफ अंतोन फर्नांडिस (३३, रा. नेरुर, ता. कुडाळ) हा जखमी झाला आहे.हा अपघात रविवार, १ जून रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्ग, हुमरमळा राणेवाडी येथे झाला. याबाबतची माहिती जॉन्सन जॉन फर्नांडिस (२६, रा. जैतापकर कॉलनी, गणेशनगर, रानबांबुळी) याने दिली. सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ फर्नांडिस याच्यावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वेगात गाडी चालवीत गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या तक्रारदार यांची बहीण सेलीना जॉन फर्नांडिस हिला गंभीर दुखापती होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याच्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ अंतोन फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोसेफ अंतोन फर्नांडिस हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०७ - एपी ८६५८) ही ओरोस ते कुडाळ अशी घेऊन चालला होता. दुचाकीवर त्याच्या मागे सेलीना जॉन फर्नांडिस ही बसली होती. हुमरमळा राणेवाडी येथील मुंबई-गोवा महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन दोघेही रस्त्यावर कोसळले. यात सेलीना हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ  रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तर दुचाकीस्वार जोसेफ फर्नांडिस हा जखमी झाला आहे.

खड्डे बुजविण्याची मागणीदरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्गावर खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये ही गाडी गेल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्यावर पडली. हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग