सिंधुदुर्ग : युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची बाजी, जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:34 PM2018-03-07T15:34:13+5:302018-03-07T15:34:13+5:30

डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गचे अनेक खेळाडू चमकले आहेत.

Sindhudurg: In Youth Games Sindhudurg players betting on, the name of the district is at the state level | सिंधुदुर्ग : युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची बाजी, जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर

डेरवण युथ गेममध्ये सहभागी यशस्वी सिंधुदुर्गचे खेळाडू व प्रशिक्षक.

Next
ठळक मुद्देयुथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची बाजीजिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर

वेंगुर्ले : डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गचे अनेक खेळाडू चमकले आहेत.

२६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत डेरवण येथे डेरवण युथ गेम अ‍ॅथलॅटिक्स स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्गच्या चैताली विश्वास पवार हिच्या नेतृत्वाखाली संघाने ४ बाय १०० रिले प्रकारात तिसरा क्रमांक संपादन करुन जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर चमकविले.

१८ वर्षे गटात चैताली पवार-४०० मीटर धावणे चौथा क्रमांक तसेच ३००० मीटरमध्ये आठवा क्रमांक, ईशा गोविंद बागवे-१५०० मीटर धावणे सातवा क्रमांक, लांब उडीमध्ये सहावा, निकिता निनावे-१५०० मीटर धावणे सहावा, लांब उडीत चौथा क्रमांक, १६ वर्षे गटात हिना गोविंद बागवे-४०० मीटर धावणे पाचवा, लांबउडीत चौथा क्रमांक, १४ वर्षे गटात दत्तप्रसाद परशुराम गोरल-२०० मीटर धावणेमध्ये पाचवा, समीर वड्डर-उंचउडी सहावा क्रमांक, १२ वर्षे गटात तन्वी शशिकांत परब-२०० मीटर धावणेमध्ये चौथा क्रमांक मिळाला.

खेळाडूंना बाबली वायंगणकर व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे सहकार्य लाभले. शिक्षक जयराम वायंगणकर, जयवंत चुडनाईक, संजीवनी परब तसेच समीर राऊत, विश्वास पवार, शशिकांत परब, गोविंद बागवे, यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Sindhudurg: In Youth Games Sindhudurg players betting on, the name of the district is at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.