स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:59 PM2017-11-16T16:59:32+5:302017-11-16T16:59:53+5:30

क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.

In the skating competition Sindhudurg first, Mumbai II and Sangli third | स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक

स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक

Next

कणकवली : क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईला द्वितीय, तर सांगलीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

१२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, सांगली, मिरज, मुंबई, सोलापूर या ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. सुमारे १४० मुले सहभागी झाली होती. देवगडच्या नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, बँक आॅफ इंडियाचे कणकवलीचे व्यवस्थापक किशोरकुमार जाधव यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.

६ वर्षांखालील मुलांमध्ये यश सावंत (सुवर्ण), मिहीर सावंत (सुवर्ण), पियूश पंडित (रौप्य),साहीश भगत (रौप्य), विनीत माणगावकर (रौप्य), दिव्यांक कोरगावकर (रौप्य). ६ वर्षाखालील मुलींमध्ये सुमन माणगावकर (सुवर्ण), वृंदा साटम (सुवर्ण), कस्तुरी कांबळे (रौप्य), ओवी गायकवाड (रौप्य). ८ वर्षाखालील मुलांमध्ये अक्षय खडपकर (सुवर्ण), निरज कांबळे (सुवर्ण) साहील पडालकर (सुवर्ण) उत्कर्ष पारधी (रौप्य), प्रथमेश परब (रौप्य),नील ढेकणे (रौप्य), ओम परब (रौप्य), शुएरूत नानल (कांस्य), निशाद माणगावकर (कांस्य), श्रीराम राणे (कांस्य). ८ वर्षाखालील मुलींमध्ये पियुशा मालाडकर (सुवर्ण) विदिता तोरस्कर (सुवर्ण), क्रिशाला तोरस्कर (रौप्य), एनजल प्रभू (रौप्य), श्रेया पराडकर ( रौप्य).

लावण्य आळवेला सुवर्णपदक
१० वर्षांखालील मुलांमध्ये लावण्य आळवे (सुवर्ण), उत्कर्ष डिचोलकर (सुवर्ण), निहार सावंत (सुवर्ण), रुद्राक्ष भुकम (सुवर्ण), सोहम लाड (सुवर्ण), सुमित सावंत (सुवर्ण), मिहीर शकरदास (रौप्य), शुभम जोशी (रौप्य), अवनीश पंडित (रौप्य), अयुश जाधव (रौप्य), ध्यैर्यशील सापळे (रौप्य), रूग्वेद पिळकर (कांस्य), तन्मय जाधव (कांस्य), १० वर्षाखालील मुलींमध्ये हर्षादा पाव (सुवर्ण), सानिका भगत (सुवर्ण), १२ वर्षाखालील मुलगे- तपन नार्वेकर, धनराज खेटलेकर, आयुश कानेकर, कैशल जाधव, सार्थक खानोलकर, वरूण जाधव, ऋतिज गावकर (सर्वांना सुवर्ण), गोविंद माळी, अनिश सावंत, अथर्व करंगुटकर(रौप्य), १४ वर्षाखालील मुली-उजमा शेख, प्रिजल गवस, भार्गवी परब(सर्व रौप्य), १६ वर्षाखालील मुले-निमीश लोके, आमीन शेख, आदर्श जोशी, मंथन शंकरदास (सर्व सुवर्ण), तन्मय गावडे, ओम आळवे, सौरभ्य धोनुकसे, सौरभ मोरजकर यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

डिसेंबरमध्ये बनारस येथे होणा-या राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग स्पर्धेसाठी निवडचाचणीही घेण्यात आली. महाराष्ट्र क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव सुशांत चव्हाण व राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव अजित चव्हाण, क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव योगेश सामंत, प्रशिक्षक वैभव सर्पे, प्रेरणा आळवे, श्रध्दा सावंत यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. विजेत्या स्पर्धकांसह महाराष्ट्र क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव सुशांत चव्हाण व राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव अजित चव्हाण, क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव योगेश सामंत, प्रशिक्षक वैभव सर्पे, प्रेरणा आळवे, श्रध्दा सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: In the skating competition Sindhudurg first, Mumbai II and Sangli third

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.