शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग होणार सुवर्णक्षणांचा साक्षीदार, पहिल्यांदाच उतरणा-या विमानातून गणराया येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:58 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ वर्षांपूर्वी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली, मात्र प्रत्यक्षात उदयास आली सहा वर्षांपूर्वी.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ वर्षांपूर्वी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली, मात्र प्रत्यक्षात उदयास आली सहा वर्षांपूर्वी. या विमानतळाचे काम सुरू झाल्यानंतर विमानतळ केव्हा पूर्ण होणार याचीच उत्सुकता सर्वांना होती. मात्र अद्याप विमानतळाचे काम सुरू आहे. पण ट्रायल लॅडिंग तरी सिंधुदुर्गात दृष्टीक्षेपात येत असल्याने सिंधुदुर्गवासियांचे डोळे बुधवारच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आतुरलेले आहेत. दुपारी ११.३० वाजता पहिले खासगी विमान सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच या धर्तीवर उतरणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला विमानतळाचे पहिले स्वप्न दाखवले ते माजी खासदार सुधीर सावंत यांनी. पण तेव्हा विमानतळ कुठे करायचे ही जागा निश्चित होत नव्हती. अनेक जागाची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. पण त्याला मुहूर्त मिळत नव्हता. अखेरीस त्यांच्याच काळात चिपी येथील माळरान निश्चित करण्यात आले होते. पण तेव्हा काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीची सत्ता आली होती.मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही सिंधुदुर्गमध्ये विमानतळ झाले पाहिजे, हा चंग मनाशी बाळगून प्रत्यक्ष जागा निश्चित करून त्यासाठी ६ कोटी रूपयांचा निधीही दिला होता. पण हे काम करत असताना युतीचीही सत्ता गेली आणि काँग्रेसची सत्ता आली. या विमानतळाची  जागा निश्चित झाली, पण पुढे त्याला चालना मिळत नव्हती. आलेला निधीही इतरत्र वळवण्यात आला होता. पण नंतर शिवसेनेतून नारायण राणे हे काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर या विमानतळाच्या कामाला पुन्हा चालना मिळाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीतच माजी आमदार जयानंद मठकर यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते.त्यानंतर प्रत्यक्ष आयआरबीने ह्यबांधा वापरा हस्तांतर कराह्ण या तत्वावर विमानतळाचे काम हाती घेत पूर्णत्वास नेले. बुधवारी खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गच्या भूमीवर प्रत्यक्ष पहिले विमान उतरणार आहे. हे विमान खासगी कंपनीचे असले आणि ट्रायल लँडिंग होत असले तरी आतापर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीवर हेलिकॉप्टर अनेक उतरली, पण विमान उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य अनेकांना मिळणार आहे.मुंबईतून बुधवारी दुपारी ११.३० ते १२ च्या दरम्यान हे विमान चिपीच्या धावपट्टीवर उतरणार असून, या विमानातून गणरायांचे आगमन होणार आहे. त्यामुळे  चिपी विमानतळ परिसरात या निमित्ताने गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्ग