शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला, मंदिरातील पुजारी बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 5:07 PM

कोकिसरे महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रोखलामंदिराचे टाळे काढणाऱ्यांवर कारवाईसाठी कोकिसरे येथे आंदोलन

वैभववाडी(सिंधुदुर्ग) :  कोकिसरे महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केले.दुपारी १.४५ वाजल्यापासून तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग दीड तास ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामुळे विद्यार्थी अडकून पडले होते.मंदिराचे टाळे काढणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी धुडकावून लावत मंदिराच्या विषयासंदर्भात तालुका दंडाधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास कोकिसरेतील महिला व ग्रामस्थ वैभववाडीत दाखल झाले होते.

त्यांच्या शिष्टमंडळाने पुन्हा बाकारे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यावेळी बाकारे यांनी दंडाधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगितले. त्यामुळे सर्व ग्रामस्थ तहसीलदारांना भेटण्यासाठी गेले होते.तहसीलदार संतोष जाधव यांनी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे सायंकाळी मंदिराला भेट देऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले. परंतु, तहसीलदारांच्या निर्णयाने समाधान न झाल्यामुळे दुपारी पावणे दोनच्या सुमारास महिला व ग्रामस्थांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीची चांगली कोंडी झाली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी रस्ता खुला करा, अन्यथा सर्वांना ताब्यात घ्यावे लागेल, असे स्पष्ट केल्यानंतर तहसीलदारांशी चर्चा करण्याच्या अटीवर कोकिसरे ग्रामस्थांनी रस्ता रोको थांबवून मार्ग खुला केला. तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर ग्रामस्थांची पुढील दिशा ठरणार आहे. 

टॅग्स :Chakka jamचक्काजामsindhudurgसिंधुदुर्ग