Sindhudurg: वनविभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत खैरतोड , एकाला रंगेहाथ पकडले :दोघे पळून जाण्यात यशस्वी
By अनंत खं.जाधव | Updated: August 18, 2023 23:36 IST2023-08-18T23:36:16+5:302023-08-18T23:36:40+5:30
Sindhudurg News: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत पणे खैराची झाडाची तोड करत असतना तीन संशयितांना वन विभागाच्या पथकाने झडप घातली मात्र यातील दोघेजण पळून गेले तर लवू एकनाथ गावडे या संशयित आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश आले

Sindhudurg: वनविभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत खैरतोड , एकाला रंगेहाथ पकडले :दोघे पळून जाण्यात यशस्वी
सावंतवाडी - क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत पणे खैराची झाडाची तोड करत असतना तीन संशयितांना वन विभागाच्या पथकाने झडप घातली मात्र यातील दोघेजण पळून गेले तर लवू एकनाथ गावडे या संशयित आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश आले असून पसार झालेल्या संदीप रामा गावडे व विश्वास गावडे या दोघांचा वनविभागाकडून शोध घेण्यात येत आहे.
इन्सुली येथील वनरक्षक संग्राम पाटील यांना क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात फिरती करताना काही लोक खैराची तोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांनी मिळून राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या आरोपींवर सायंकाळच्या सुमारास झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला.
पण यातील लवू एकनाथ गावडे याला ताब्यात घेण्यात आले तर इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील पकडला गेलेल्या आरोपीचे घटनास्थळावरून फरार झालेल्या दोन आरोपी वेत्ये येथील आहेत. त्यानंतर सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीमसह वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी घटनास्थळी जाऊन पकडलेल्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याबरोबरच फरार आरोपींच्या दोन दुचाकी ही जप्त केल्या असून, फरार झालेल्या आरोपींचा वन विभागाकडून कसून तपास करण्यात येत आहे.