शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही :  सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:09 IST

वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

ठळक मुद्दे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही : सुरेश प्रभूदिल्लीत चिपी विमानतळाच्या कामाचा महिन्याभरात तिसऱ्यांदा आढावा

सिंधुदुर्ग : वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.दिल्ली येथे झालेल्या विशेष बैठकीला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआरबी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभू यांनी विमानतळ प्रकल्पाबाबत काही समस्या असल्यास त्या तातडीने नमूद करून सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रवासी वाहतुकीला आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही, असे आदेशही दिले.महाराष्ट्र शासनाकडून आयआरबी कंपनीला काही समस्या असल्यास त्या सोडविण्याच्यादृष्टीनेही शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. सुरेश प्रभू यांच्याकडे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जून महिन्यात चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत सर्व अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या भेटीदरम्यान प्रभू यांनी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत चिपी विमानतळ सुरू करण्याच्यादृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.त्यानंतर जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत प्रभू यांनी या विमानतळाच्या कामाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. चिपी विमानतळाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आणि केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले होते.हवाई मंत्रालयाचा अद्याप ग्रीन सिग्नल नाहीप्रत्यक्षात सुरेश प्रभू किंवा हवाई वाहतूक मंत्रालयाने चिपी विमानतळ सुरू कधी होणार याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र, या विमानतळाचे काम शीघ्रगतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय खासगी कंपन्यांची विमाने येथे उतरू शकत नाहीत.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळSuresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्ग