सिंधुदुर्गात दहा पदे पदोन्नतीने भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:38 IST2019-09-21T13:37:26+5:302019-09-21T13:38:22+5:30
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ६ उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण १० पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा सर्व पदांना अधिकारी मिळाले आहेत.

सिंधुदुर्गात दहा पदे पदोन्नतीने भरली
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात ६ उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण १० पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा सर्व पदांना अधिकारी मिळाले आहेत.
सिंधुदुर्ग महसूल विभागात सहा उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण दहा पदे भरण्यात आली आहेत. सिंधुदुर्गात तब्बल सहा उपजिल्हाधिकारी पदे भरण्यात आली आहेत.
यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दादासाहेब गीते, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारीपदी प्रशांत पानवेकर, भूसंपादन अधिकारी (मुख्यालय) वर्षा शिंगण, भूसंपादन इमारत व दळणवळण अधिकारी म्हणून डी. एस. ढगे, कुडाळ प्रांताधिकारीपदी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारीपदी वैशाली राजमाने अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सहा उपजिल्हाधिकारी पदांबरोबरच चार तहसीलदार पदेही भरण्यात आली आहेत. यात कुडाळ तहसीलदार म्हणून रवींद्र नाचणकर, दोडामार्ग-मोरेश्वर हाडके, कणकवली-आर. जे. पवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार म्हणून अमोल पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना पदोन्नतीने वरील पदी नियुक्त्या मिळाल्या आहेत.