शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सिंधुदुर्ग : पोलिसांकडून ताडपत्री गँगचा पर्दाफाश, गुजरातमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:29 IST

मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस दलाने पर्दाफाश केला आहे. ताडपत्री गँग म्हणून प्रसिद्ध असलेले हे रॅकेट गोध्रा (गुजरात) येथील असून या रॅकेटमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी (३७) आणि सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कवठी या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग पोलिसांकडून ताडपत्री गँगचा पर्दाफाशगुजरातमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करायचे चोरी

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस दलाने पर्दाफाश केला आहे. ताडपत्री गँग म्हणून प्रसिद्ध असलेले हे रॅकेट गोध्रा (गुजरात) येथील असून या रॅकेटमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी (३७) आणि सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कवठी या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत.

दोन वाहनांसह २४ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या ताडपत्री गँगमधील आणखी काही जणांचा तसेच माल विक्री करणाऱ्या दलालांचा तपास लागला असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेऊ अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.यावेळी गेडाम म्हणाले की, १ एप्रिल रोजी रात्री कुडाळ येथील हॉटेल राजसमोर व तळेरे कोचरेकर पेट्रोलपंप येथे उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून आतील खसखस, इलेक्ट्रिकल सामान व डिझनी फ्रोझन हॅण्ड वॉश असा ७ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता.

याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर या चोरीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास केला असता दोन्ही गुह्यांची पद्धत एकच होती. त्यामुळे हे गुन्हे एकाच टोळीने केले असावेत तसेच यापूर्वी राज्यात झालेल्या चोऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यातील गोध्रा येथील ताडपत्री गँगचे हे काम असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.जिल्ह्यातील चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी ट्रक व एक गाडी वापरल्याची माहिती मिळाली होती. अधिक तपास केल्यावर या चोऱ्यांसाठी गाडी वापरल्याचे उघड झाले. ती गाडी गुजरातमधील असल्याचे निश्चित होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन ताडपत्री गँगमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी व सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कठडी (दोघेही रा. गोध्रा- गुजरात) या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार चोरीतील माल नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापारी विनोद भगवानदास बनिया उर्फ वाणी यांना विकल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.इतरांचा शोध सुरूताडपत्री गँगच्या या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? यात कोण कोण दलाल आहेत का याबाबत कसून तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

२४ लाखांचा मुद्देमाल जप्तया चोरट्यांकडून २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १ लाख ७३ हजार ९३० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच ट्रक व गाडीचाही समावेश असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस