सिंधुदुर्ग : जानवली येथे रिक्षाचालकाची आत्महत्या, परिसरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:49 PM2018-11-12T13:49:53+5:302018-11-12T13:51:03+5:30

कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली वाकाडवाडी येथील एका रिक्षा चालक तरुणाने स्वतःच्या घरालगत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . हा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला . जयेश सुनील राणे ( 25 )असे त्या तरुणाचे नाव आहे . जयेशचा मृतदेह घराच्या आवारातील एका झाडाला लटकलेला होता.

Sindhudurg: Suicide in the Junkyard, rickshaw driver commits suicide in the area | सिंधुदुर्ग : जानवली येथे रिक्षाचालकाची आत्महत्या, परिसरात खळबळ

सिंधुदुर्ग : जानवली येथे रिक्षाचालकाची आत्महत्या, परिसरात खळबळ

Next
ठळक मुद्देजानवली येथे रिक्षाचालकाची आत्महत्यापरिसरात एकच खळबळ

कणकवली : शहरापासून जवळच असलेल्या जानवली वाकाडवाडी येथील एका रिक्षा चालक तरुणाने स्वतःच्या घरालगत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . हा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला . जयेश सुनील राणे ( 25 )असे त्या तरुणाचे नाव आहे . जयेशचा मृतदेह घराच्या आवारातील एका झाडाला लटकलेला होता.

जयेश हा दहावी शिकलेला होता. अलीकडेच तो रिक्षा व्यवसाय करायला लागला होता . मनमिळावू स्वभावाचा आणि प्रामाणिक असलेला जयेश कसल्या तरी तणावाखाली होता. शनिवारी रात्री तो उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याची शोधाशोध कुटुबियानी सुरू केली. त्यावेळी घराच्या आवारातील एका झाडाला दोरिने गळफास घेऊन जयेश ने आत्महत्या केल्याचे उघड झाले .त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकाराने जानवली परिसरावर शोककळा पसरली आहे . जयेशाच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत उघड झाले नव्हते . माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करून रविवारी मृतदेह ताब्यात देण्यात आला.

जानवली येथील स्मशानभूमीत जयेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र , तरुणवयात जयेशने का आत्महत्या केली ? याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title: Sindhudurg: Suicide in the Junkyard, rickshaw driver commits suicide in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.