शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सिंधुदुर्ग : कासार्डेतील वाळू व्यवसाय बंद करा, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:48 AM

कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय सुरु असून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणचा वाळू व्यवसाय बंद व्हावा, अशी मागणी अवैध धंदेविरोधी समिती सदस्य संजय नकाशे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देकासार्डेतील वाळू व्यवसाय बंद करा, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अवैध धंदेविरोधी समितीसह ग्रामस्थांनी वेधले लक्ष

कणकवली : तालुक्यातील कासार्डे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय सुरु असून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

यामुळे धुळीचे साम्राज्य पसरून शाळकरी मुलांना तसेच रहिवाशांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या ठिकाणचा वाळू व्यवसाय बंद व्हावा, अशी मागणी अवैध धंदेविरोधी समिती सदस्य संजय नकाशे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे केली आहे.यावेळी अवैध धंदे विरोधी समिती सदस्य संजय नकाशे, गोट्या पाताडे, दीपक शिर्सेकर, रुपेश कानसे, संतोष कानडे, अभिजित शेट्ये, सागर शिर्सेकर, पप्या लाड आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासार्डे परिसरातील नागरिकांच्या वस्तीच्या ठिकाणी वाळू व्यवसाय सुरु असल्याने नागरिकांना तसेच शाळेतील मुलांना रस्त्यावरून ये-जा करताना धुळीशी सामाना करावा लागत आहे.

या वाळू वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. आपला वाळू व्यवसायास विरोध नसून नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे हा व्यवसाय नागरिकांच्या वस्तीपासून दूर ठिकाणी असलेल्या ठिकाणी करावा असेही यात म्हटले आहे.

अन्यथा पाच दिवसांनंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणारसध्या वाळू उपशावर बंदी असून कासार्डे येथील या वाळू व्यवसायासाठी प्रशासनाकडून कशाप्रकारे व कोणत्या प्रकारची परवानगी दिली आहे. याचा खुलासा करावा.

यावर गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कारवाई होऊन हे व्यवसाय बंद करावेत. अन्यथा, पाच दिवसानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्यावतीने उपोषण छेडले जाईल, असा इशाराही यावेळी २८ ग्रामस्थांच्या सह्यांसह प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार