शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग एस.टी. विभागाची मालमत्ता जप्ती थांबली, अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा वेधले लक्ष; नुकसानभरपाई व्याजासह कोटीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:46 IST

जानवली अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे न्यायालयीन प्रकरण

कणकवली : सन २००३ मध्ये झालेल्या दुचाकी आणि एस. टी. बसच्या अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. जिल्हा न्यायालयाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाई आदेशास अनुसरून, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी १ कोटी २ लाख ७९ हजार ४४७ रुपये भरपाईसाठी वसुली दरखास्त दाखल केली होती. शुक्रवारी (दि.२) कणकवली न्यायालयाचे बेलिफ आणि अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग कार्यालयात मालमत्ता जप्ती करण्यासाठी हजेरी लावली होती.या घटनेने एस.टी.च्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनात कार्यवाहीचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित अधिकारी मीनल कांबळी यांच्याकडे १२ जानेवारी २०२६ पर्यंत रक्कम अदा करण्यासाठी मुदत मागितली. या मागणीला दाद देत दरखास्तदारांनी दिलेल्या मुदतीमुळे तूर्तास मालमत्ता जप्ती टाळण्यात आली आहे.

नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह १ कोटी १९ लाख ८२९सन २००३ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या घटनेत देवगडच्या निशिकांत कांबळी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या नुकसानभरपाईसाठी २०१२ साली एस.टी.कडून ४७ लाख ८२ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश होते. मात्र, एस. टी. महामंडळाने उच्च न्यायालयात अपील केले. ते अपिल रद्द झाल्यानंतर आता नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह १ कोटी १९ लाख ८२९ रुपये इतकी झाली आहे.

१२ जानेवारीपूर्वी तातडीने रक्कम अदा करण्याचे आश्वासनशुक्रवारी झालेल्या जप्तीच्या आदेशांतर्गत दोन लाल रंगांच्या एस. टी. बसेस, दोन वातानुकुलित शिवशाही बसेस व अन्य मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश होते. मात्र, वरिष्ठांच्या निर्देशांनंतर आणि धनादेशाच्या प्रक्रियेनंतर, तूर्तास न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता जप्तीची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. १२ जानेवारीपूर्वी एस.टी. महामंडळाने तातडीने रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg ST Asset Seizure Halted; Accident Case Draws Attention Again

Web Summary : Sindhudurg ST asset seizure halted after a 2003 accident case resurfaced. Court ordered compensation of ₹1.19 crore. ST promised payment before January 12, 2026, averting bus seizures. The case involves a 2003 accident and subsequent legal appeals.