शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक झाडीत लपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:10 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची चौपदरीकरणारच्या कामात नासधूस झाली आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या पर्यटकांना मार्ग समजण्यास कठीण जात आहे. या फलकावरील झाडी झुडपे हटविण्याची मागणी नागरीक व वाहनचालकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक झाडीत लपलेपर्यटकांना मार्ग समजणे झाले कठीण : झाडी तोडण्याची मागणी

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची चौपदरीकरणारच्या कामात नासधूस झाली आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या पर्यटकांना मार्ग समजण्यास कठीण जात आहे. या फलकावरील झाडी झुडपे हटविण्याची मागणी नागरीक व वाहनचालकांकडून केली जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला असताना महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पावसाळ्यात झाडी झुडपे वाढल्याने त्यांनी दिशादर्शक फलकावर पसरल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व वाहनचालकांना धोकादायक ठिकाण, स्पीड ब्रेकर, वाहनांचा वेग, मार्ग दाखविणारे फलक दिसत नाहीत. गणेशोत्सवाच्या दरम्यान येणारे नवीन चालक व पर्यटक यांना वाहने हाकताना अडचण निर्माण होत आहे.तसेच काही ठिकाणी महामार्ग चौपदरीकरण सुरु असताना लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या फलकाची झाडे व खोदाई करताना नासधूस झालेली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला आहे. दिशादर्शक फलकावर वाढलेली झाडी हटविण्यात यावी व दिशादर्शक फलकाची झालेल्या नुकसानीची योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग