सिंधुदुर्ग : निगुडेत नारळ बागेला आग, शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:07 IST2018-02-17T19:00:02+5:302018-02-17T19:07:19+5:30
निगुडे-खांबाचा होळ याठिकाणी असलेल्या अजित गोविंद तुळसकर यांच्या नारळ बागेला दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागून ३० झाडे जळून खाक झाली. यात तुळसकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

निगुडेतील नारळ बागेला अचानक आग लागून ३० झाडे जळून खाक झाली. (नीलेश मोरजकर)
बांदा : निगुडे-खांबाचा होळ याठिकाणी असलेल्या अजित गोविंद तुळसकर यांच्या नारळ बागेला दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागून ३० झाडे जळून खाक झाली. यात तुळसकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
खांबाचा होळ याठिकाणी अजित तुळसकर यांची मोठी बाग आहे. दुपारच्या सुमारास आग लागल्यामुळे कोणाच्या लक्षात आले नाही. लांबून आगीचा धूर दिसल्यामुळे आग लागल्याचे समजले. दुपारची वेळ, सोसाट्याचा वारा असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले. आगीत ३० नारळांची झाडे जळाली. यात सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे समजते.
तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ईशा तुळसकर, चित्रेश शिरोडकर, आबा तुळसकर यांनी अतोनात प्रयत्न केले. घटनास्थळाची निगुडे ग्रामसेविका तन्वी गवस, उपसरपंच गुरुदास गवंडे, सुचिता मयेकर यांनी पाहाणी केली.