शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सिंधुदुर्ग : राजकीय हाणामारी प्रकरणी पारकर-नलावडे गटाच्या २० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:29 PM

कणकवली शहरात दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी नलावडे गटाच्या १३ जणांना तर पारकर गटाच्या ७ जणांना  पोलिसांनी अटक केली. त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही गटाच्या २० जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अखेर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजकीय हाणामारी प्रकरण : पारकर-नलावडे गटाच्या २० जणांना अटकशहरात तणावपूर्ण शांतता !

कणकवली : कणकवली शहरात दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी नलावडे गटाच्या १३ जणांना तर पारकर गटाच्या ७ जणांना  पोलिसांनी अटक केली. त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही गटाच्या २० जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अखेर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली महाविद्यालयात युवकाला मारहाण झाल्याच्या पार्श्वभुमीवर संदेश पारकर यांच्या घरासमोर गाडयांची तोडफोड, गैरकायदा जमाव, लाठयाचा वापर करुन दहशत, शिवीगाळ, धमकी, आरडाओरड केल्याप्रकरणी नगराध्यक्ष समिर नलावडे व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यामुळे समीर नलावडे , माजी नगरसेवक किशोर राणे, बांधकाम सभापती अभिजीत मुसळे, नगरसेवक बंडु हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष राकेश राणे, राजा पाटकर, संदीप नलावडे, निखिल आचरेकर, जावेद शेख, पंकज पेडणेकर , विजय इंगळे गुरूवारी सकाळी ११.४० वा़जता स्वत:हून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले.

त्यांच्यावर रितसर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुपारी त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या आरोपींच्यावतीने जामिनासाठी अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. राजेश परुळेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यानुसार सर्व आरोपींना जामिन मंजूर झाला आहे. या गटातील एका अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कणकवली न्यायालयात पारकर गटाच्या संशयीत आरोपींना हजर करताना पोलीस़याच प्रकरणात कणकवली महाविद्यालय परिसरात जीवन दिनेश राणे व त्याचा मित्र भावेश कमलाकर निग्रे यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संशयीत आरोपी आदीत्य सापळे, ऋषी वाळके, गौरव सरूडकर, योगेश कोरगावकर, राहुल पेटकर, अक्षय घुरसाळे, शुभम पेडणेकर या सात जणांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुपारी हजेरी लावली.

पोलीसांनी या सातही आरोपींवर अटकेची कारवाई करून न्यायालयात हजर केले. त्यानाही न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपींच्या जामिनासाठी अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. भूषण भिसुरे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन सातही आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे.

या प्रकरणात नाव आलेला एक युवक घटना घड़ली तेव्हा महाविद्यालयातील वर्गात असल्याचा पुरावा सादर करण्यात आल्याने त्याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी बाजू मांडली.शहरात तणावपूर्ण शांतता !संदेश पारकर यांच्या घरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलिसांची अधिक कुमक वाढविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी या हाणामारीच्या घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग