शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
3
मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
4
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
5
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
6
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
7
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
8
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे,'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
9
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
10
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
11
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
12
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
13
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
14
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
15
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
16
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
17
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
18
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
19
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
20
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:09 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीसअभियानात सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन : कमलाकर रणदिवे

सिंधुदुर्गनगरी : शासनाने स्वच्छ भारत मिशन आणखी प्रभावित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रभाग ते जिल्हा परिषद अशा विविध स्पर्धा जाहीर केल्या असून, उत्कृष्ट प्रभागाला १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्या पंचायत समितीला ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाग घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.कमलाकर रणदिवे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.यावेळी रणदिवे पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायत प्रभाग स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सर्व स्वायत्त संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग वाढवावा यासाठी स्पर्धांचे आयोजन केले आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामअंतर्गत आता ग्रामपंचायत प्रभागवार स्वच्छ प्रभाग स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रभागांची तपासणी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत गठीत समितीद्वारे १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्रभागासाठी १० हजार रुपये एवढे पारितोषिक असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक प्रभाग निवडला जाणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील एक ग्रामपंचायत उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवडली जाणार असून ही स्पर्धा तालुकास्तरावर होणार आहे.

यासाठी प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीद्वारे १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत तपासणी होणार आहे.उत्कृष्ट जिल्हास्तर ग्रामपंचायत स्पर्धाजिल्हास्तरावर उत्कृष्ट प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे ग्रामपंचायतींचे क्रमांक काढण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषद प्रभागातून निवड झालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी या स्पर्धेसाठी होणार आहे. ही तपासणी १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून यासाठी ५ लाख, ३ लाख, २ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.विभागस्तर उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धाजिल्हास्तरावर बक्षीसपात्र ठरलेल्या गुणानुक्रमे प्रथम दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात येणार असून यासाठी प्रथम क्रमांकास १० लाख, द्वितीय ८ लाख आणि तृतीय क्रमांकास ६ लाख रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या ग्रामपंचायतींची विभागीय आयुक्तांकरवी १ ते ३१ मार्च या कालावधीत तपासणी केली जाणार आहे.राज्यस्तर उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धाविभागस्तरावर बक्षीसपात्र ठरलेल्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींना या स्पर्धेत सहभाग घेता येणार असून या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी समितीमार्फत १ मे ते ३० जून या कालावधीत तपासणी होणार आहे. यासाठी अनुक्रमे २५, २० आणि १५ लाख रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धाही स्पर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी असून ती राज्यस्तरावर होणार आहे. स्वच्छ जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांकास १ कोटी, द्वितीय क्रमांकास ७५ लाख आणि तृतीय क्रमांकास ५० लाख रुपये तर स्वच्छ पंचायत समितीसाठी प्रथम क्रमांकास ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय क्रमांकास २० लाख अशी बक्षीस योजना असल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग