सिंधुदुर्ग :  वाळूसाठी मुंबईत १९ ला मुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:58 PM2018-12-15T16:58:33+5:302018-12-15T17:00:12+5:30

आमदार  प्रसाद लाड यांनी आंदोलकांची भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत १९ डिसेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्यासह बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.

Sindhudurg: Meeting with Chief Minister on 19th July in Mumbai for Sand | सिंधुदुर्ग :  वाळूसाठी मुंबईत १९ ला मुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बैठक

सिंधुदुर्ग :  वाळूसाठी मुंबईत १९ ला मुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बैठक

Next
ठळक मुद्देवाळूसाठी मुंबईत १९ ला मुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत बैठकभाजप आमदार प्रसाद लाड यांचे डंपर आंदोलकांना आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाळूसाठी गेल्या चार दिवसापासून उपोषणास बसलेल्या डंपर चालक-मालक यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार  प्रसाद लाड यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली.

यावेळी त्यांनी आंदोलकांची भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत १९ डिसेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्यासह बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील. आंदोलकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आपण त्यांना केले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेतले जाईल, असा विश्वास आमदार लाड यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, राजन तेली, संदेश पारकर, अतुल रावराणे व अन्य उपस्थित होते. दरम्यान, आंदोलक अजून आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे समजते.

Web Title: Sindhudurg: Meeting with Chief Minister on 19th July in Mumbai for Sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.