शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सिंधुदुर्ग : महावितरणला वादळाचा तडाखा, कणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 3:31 PM

सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणला वादळाचा तडाखाकणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

कणकवली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

वीज वाहिन्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास आलेले वादळ सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत सुरूच होते. या वादळासोबत पाऊसही पडत होता.कणकवली विभागात वादळामुळे शंभराहून अधिक विजेचे खांब पडले असून असलदे, कनेडी, खारेपाटण, फोंडाघाट या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचा पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीची नेमकी आकडेवारी शुक्रवारीच स्पष्ट होऊ शकणार आहे. वादळ कमी होताच महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी विविध वाहिन्यांवर पडलेली झाडे व त्याच्या फांद्या हटविण्यास सुरुवात केली होती.गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या संततधार पावसाचा वीज वितरण कंपनीला फटका बसला. वीज वाहिन्यांवर, खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने खारेपाटण, असलदे, कनेडी, फोंडा या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत केला.नागरिकांना कडक उन्हाचा जोरदार तडाखा बसत असताना गुरुवारी सायंकाळी गडगडाटासह कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे कणकवली शहरासह तालुक्यात गारवा निर्माण झाला आहे. मात्र अचानक झालेल्या पावसाच्या आगमनामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.

काही घरांच्या छप्पराचे पत्रे उडून गेले, तर पावसापूर्वीची कामे खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. मात्र, येथील तहसील कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने कुठेही नुकसान झाल्याची नोंद नव्हती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसmahavitaranमहावितरण