सिंधुदुर्ग : कणकवलीतील रेल्वे स्थानकावर दारू जप्त, जनरल डब्यात सापडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:19 IST2018-04-09T15:15:02+5:302018-04-09T15:19:19+5:30
कणकवली रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी दारू जप्त केली. या दारुची किंमत ४ हजार ९०० रुपये आहे. रेल्वेची तपासणी करताना पोलिसांना ही दारू आढळून आली. शनिवार ७ एप्रिल रोजी ओखा एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेली ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली.

सिंधुदुर्ग : कणकवलीतील रेल्वे स्थानकावर दारू जप्त, जनरल डब्यात सापडली दारू
ठळक मुद्देकणकवलीतील रेल्वे स्थानकावर दारू जप्तजनरल डब्यात सापडली दारू
सिंधुदुर्ग : कणकवली रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी दारू जप्त केली. या दारुची किंमत ४ हजार ९०० रुपये आहे. रेल्वेची तपासणी करताना पोलिसांना ही दारू आढळून आली.
शनिवार ७ एप्रिल रोजी ओखा एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेली ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
ही दारू गोव्याहून मुंबईकडे नेण्यात येत होती. ओखा एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबविण्यात आल्यानंतर पोलिसांनी डबे तपासले असता जनरल डब्यात ही दारू सापडली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.