सिंधुदुर्ग : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, शेतकरीवर्ग भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:38 IST2018-01-20T17:34:20+5:302018-01-20T17:38:43+5:30
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. सोनुर्ली येथील यशवंत गावकर यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. भरवस्तीत शिरून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, शेतकरीवर्ग भयभीत
तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. सोनुर्ली येथील यशवंत गावकर यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. भरवस्तीत शिरून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे.
वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधार्थ भरवस्तीत घुसू लागल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील पाल, होडावडे गावात बिबट्याचा संचार वाढला आहे. ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून बिबटे आपली भूक भागवत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. सोनुर्ली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वासरे, गुरे यांचा बळी जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.