पहाटे फिरायला जाणाºयांना सावधान , फलटण शहरात बिबटोबा सीसीटीव्हीत कैद : उत्सुकता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 08:47 PM2017-11-29T20:47:36+5:302017-11-29T20:49:28+5:30

फलटण : शहरात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी बिबट्या किंवा वाघ आढळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती. याबाबतची उत्सुकता आता संपली

 Bibtoba CCTV in captivity to dawn-to-dawn, Phaltan city: Curiosity ran out | पहाटे फिरायला जाणाºयांना सावधान , फलटण शहरात बिबटोबा सीसीटीव्हीत कैद : उत्सुकता संपली

पहाटे फिरायला जाणाºयांना सावधान , फलटण शहरात बिबटोबा सीसीटीव्हीत कैद : उत्सुकता संपली

Next

फलटण : शहरात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी बिबट्या किंवा वाघ आढळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती. याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात मंगळवारी रात्री दीडच्या सुमरास बिबट्या वावरताना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. भरवस्तीत बिबट्याच्या वावरामुळे दहशत कायम आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते, पोलिस, नगरपालिकेने शोध मोहीम राबविली आहे. मंगळवार, दि. २८ रोजी सकाळी साडेपाचला मारवाड पेठेतून एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. हे समजल्यानंतर वन अधिकारी, कर्मचाºयांनी शहर परिसर पिंजून काढला. परंतु त्यांना बिबट्या आढळला नाही. विमानतळ परिसरात काहींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले.

बारस्कर चौकातील एका मंदिरात बुधवार, दि. २९ रोजी सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील गजानन चौकातील सिटीप्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटिव्ही कॅमेºयात रात्री दीड वाजता बिबट्या आवारात फिरताना व त्यानंतर थिएटरच्या तटभिंतीवरून उडी मारून बाहेर जाताना चित्रित झाले. यावरून गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाजार समितीचे सभापती व नगरसेवक रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तेथील रखवालदार व अन्य अधिकारी, कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यासुमारास काही घरांचे पत्रे वाजले होते. यावरून बिबट्या घरावरून गेला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी वन, पोलिस अधिकारी व नगराध्यक्षा नीता नेवसे, मिलिंद नेवसे, पालिका अधिकाºयांशी चर्चा करून याबाबत नागरिकांना जागृत करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत नगरपरिषद व वनखात्याच्या वाहनातून शहरात ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात आली.

पहाटे फिरायला जाणाºयांना सावधानतेचे आवाहन
विशेषत: पहाटे फिरावयास जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत वनखाते व पोलिसांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. मात्र सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

उपनगरांमध्ये ध्वनिक्षेपकावरून सूचना
शहराप्रमाणेच शहरालगतच्या कोळकी, जाधववाडी, ठाकूरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही ध्वनिक्षेपकावरून ग्रामस्थांना माहिती देऊन सावधानता बाळगण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या आहेत.

 

Web Title:  Bibtoba CCTV in captivity to dawn-to-dawn, Phaltan city: Curiosity ran out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.