शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

सिंधुदुर्ग : कोकिसरेत पुजाऱ्याचे माहेरवाशिनीशी गैरवर्तन, मंदिराला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:43 IST

कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी आलेल्या माहेरवाशिनीशी पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमहालक्ष्मी मंदिरातील प्रकार : ग्रामस्थांनी मंदिराला ठोकले टाळे पुजारी हटविण्याची मागणी; सोमवारी होणार सुनावणी

वैभववाडी : कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी आलेल्या माहेरवाशिनीशी पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली आहे.

पुजाऱ्याने केलेल्या दृष्कृत्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी चक्क ग्रामदेवतेच्या मंदिराला टाळे ठोकून पुजारी हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार जाधव यांनी सोमवारी (२८) रोजी सुनावणी ठेवली असून ग्रामस्थ व पुजाऱ्याला नोटीस दिली आहे. तसेच ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे तातडीने काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवस्थानाचा वाद न्यायप्रवीष्ट असून काही वर्षे देवस्थान बंद होते. वर्षभरापूर्वी गावातील दोन्ही गटाच्या लोकांनी देवीच्या दैनंदिन पूजेसाठी दत्ताराम भिकू गुरव यांची नेमणूक केली होती. त्यामुळे गेले वर्षभर पुजाऱ्याकरवी देवीची दैनंदिन पूजाअर्चा व ग्रामस्थांचे मंदिरात जाणे-येणे सुरु आहे.गावातील माहेरवाशीन देवीची ओटी भरण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात गेली होती. त्यावेळी पुजाऱ्याने तिच्याशी अश्लाद्य वर्तन केले, अशी लेखी तक्रार पिडीत माहेरवाशिनीच्या नातेवाईकांनी गावचे प्रमुख मानकरी अनंत मिराशी यांच्याकडे केली. त्यामुळे मिराशी यांच्या घरी ग्रामस्थांची बैठक झाली.

पुजाऱ्याने केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ मंदिराला टाळे ठोकून ग्रामस्थांनी पुजारी हटविण्याची मागणी केली आहे.

त्या बैठकीत पिडीतेच्या नातेवाईकांचा तक्रार अर्ज वाचण्यात आला. त्यावर चर्चा होऊन महालक्ष्मी मंदिरात नेमलेल्या पुजाऱ्याने केलेल्या गैरवर्तनामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील कुणालाही श्री महालक्ष्मी तसेच गावातील अन्य मंदिरात पूजा करण्यास बंदी घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाबाबत गुरुवारी मध्यरात्री पोलिसांना लेखी कल्पना देण्यात आली. बैठकीतील निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सकाळी सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थ महालक्ष्मी मंदिराच्या आवारात जमले. त्यावेळी पोलीस उपस्थित होते.

ग्रामस्थांनी पोलिसांच्या उपस्थितीत महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून दरवाज्यावर निषेधाचा फलक लावण्यात आला आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनंत मिराशी, प्रभाकर वळंजू, विश्वनाथ मेस्त्री, अनंत नेवरेकर, अभिजित मिराशी आदी उपस्थित होते.सोमवारी सुनावणीकोकिसरे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार सुनावणीसाठी तहसीलदार संतोष जाधव यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना नोटीस काढली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हजर राहून आपले म्हणणे मांडावे.

आपण सुनावणीला हजर नसल्यास आपणास काही सांगायचे नाही, असे समजून निर्णय दिला जाईल, असे नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे तातडीने काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा