शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : 'कणकवली पर्यटन महोत्सव' ३१ जानेवारी पासून, ३ फेब्रुवारी रोजी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 4:10 PM

कणकवली येथील नगरपंचायतीच्यावतीने कणकवली पर्यटन महोत्सव ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे'कणकवली पर्यटन महोत्सव' ३१ जानेवारी पासून, ३ फेब्रुवारी रोजी समारोपसमीर नलावडे यांची माहिती; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली : येथील नगरपंचायतीच्यावतीने कणकवली पर्यटन महोत्सव ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत फुड फेस्टिव्हल, फॅशन शो, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होणार असून हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत आणि नामवंत गायक-गायिकांची मांदियाळीच यानिमित्ताने कणकवलीत दाखल होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणे , राजू गवाणकर आदी उपस्थित होते.समीर नलावडे म्हणाले , या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने ३१ जानेवारी रोजी फ़ूड फेस्टिव्हल होणार असून त्याचे उदघाट्न शहरातील प्रतिष्ठित नागरिक करतील. याच दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येईल. तर १ फेब्रुवारी रोजी पर्यटन महोत्सवाचे उदघाट्न माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होईल .त्यापूर्वी शहरातील प्रत्येक प्रभागातून एक असे १७  चित्ररथ तयार करण्यात येणार आहेत. त्यांची शोभायात्रा पटकीदेवी येथून महोत्सव स्थळापर्यन्त काढली जाणार आहे. सहभागी १७ चित्ररथाना प्रत्येकी रोख रूपये ५००० देण्यात येणार आहेत. तर चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक १०,००० रूपये, द्वितीय ५००० रूपये तर तृतीय क्रमांकासाठी  ३,००० रूपये अशी पारितोषिके प्रमाणपत्रासह दिली जातील. तसेच स्थानिक कलावंतांचाही साडे तीन तासांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम याच दिवशी होईल.२ फेब्रुवारीला फॅशन शो रंगणार आहे. यावेळी पारितोषिक वितरण निलमताई राणे यांच्या हस्ते होईल. तर ३ फेब्रुवारीला महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे , आमदार नीतेश राणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित रहातील.या दिवशी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंताच्या उपस्थितीत ऑकेस्ट्रा व इतर कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज पाककला स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा व इतर कार्यक्रमही होणार आहेत. त्याची प्रसिध्दि वेळोवेळी केली जाईल असे सांगतानाच कणकवली वासियानी आपल्या हक्काच्या या पर्यटन महोत्सवात बहुसंखेने सामिल होऊन आनंद द्विगुणित करावा. असे आवाहन समीर नलावडे यांनी यावेळी केले.नगरपंचायत फंडातून पैसे वापरणार नाही !या महोत्सवासाठी शहरातील कुणाकडूनही कसल्याच प्रकारची वर्गणी घेतली जाणार नाही. तसेच नगरपंचायतीच्या फंडातूनही एक रुपया वापरला जाणार नाही. आम्ही स्वखर्चाने तसेच आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेणार आहोत. शहरातील कोणाजवळ कोणीही महोत्सवासाठी वर्गणी अथवा पैसे मागत असेल तर थेट संबधितानी आपल्याशी संपर्क साधावा असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.नवीन ब्रॅण्ड अम्बेसीडरची नियुक्ती !कणकवली शहरात स्वच्छता सर्व्हेक्षण अभियानांतर्गत डॉ. विद्याधर तायशेट्ये व प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची नविन ब्रॅण्ड अम्बेसीडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहिर केले.

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग