शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सिंधुदुर्ग : शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:44 IST

रिक्त पदांवरील शिक्षकांच्या मान्यतेपासून ते वेतनापर्यंतच्या अनेक प्रश्नांबाबत गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून केवळ चर्चा केली जात आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने माध्यमिक शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणारकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलनराज्य संघटनेची विविध टप्प्यात आंदोलने!

ओरोस : रिक्त पदांवरील शिक्षकांच्या मान्यतेपासून ते वेतनापर्यंतच्या अनेक प्रश्नांबाबत गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून केवळ चर्चा केली जात आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने माध्यमिक शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

तसेच मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही या संघटनेने यावेळी दिला. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ८५ माध्यमिक शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडले.सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी माध्यमिक शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. के. जी. जाधवर, एन. के. साळवी, डी. जे. शितोळे, व्ही. आर. खरात, एन. के. प्रभू, जे. जी. पाटील, डी. बी. वनवे, एन. एन. मासी यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.गेल्या चार वर्षांपासूनच्या नवीन वाढीव पदांनाही अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने अनेक शिक्षकांची नोकरी अधांतरी आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व आय. टी. विषयाचे शिक्षक वेतनापासून वंचित आहेत.२००५ पूर्वीच्या व त्यानंतरच्या अंशकालीन शिक्षकांना जुन्या नियमाप्रमाणे पेन्शन लागू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे अर्धवेळ शिक्षकांची सेवा वरिष्ठ व निवडश्रेणी तसेच पेन्शनसाठी ग्राह्य धरली पाहिजे आदी विविध प्रलंबित मागण्यांसह वेतन, रिक्त पदांवरील भरती, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या भरतीमध्ये होणारा विलंब, अंशकालीन शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे यापूर्वी आंदोलने करण्यात आली. मात्र दरवेळी केवळ चर्चा आणि बैठका होत असून कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेतला जात नाही. केवळ चर्चेपुरतेच विचारात घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून होणाऱ्या दिरंगाईचा फटका शिक्षकांना बसत आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य महासंघाने पाच टप्प्यात आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.पहिल्या टप्प्यात ८ डिसेंबर २०१७ रोजी सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर धरणे आंदोलन तर दुसऱ्या टप्प्यात १९ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १८ जानेवारी २०१८ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.मात्र याचीही शासनाने दखल न घेतल्याने संघटनेच्या आदेशानुसार चौथ्या टप्प्यात माध्यमिक शिक्षक पतपेढीसमोर जेलभरो आंदोलन छेडण्यात आले, असे सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनेचे अध्यक्ष प्रा. के. जी. जाधवर यांनी सांगितले.राज्य संघटनेची विविध टप्प्यात आंदोलने!कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य संघटनेच्यावतीने विविध टप्प्यात आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकत बहिष्कार आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही प्रा. के. जी. जाधवर यांनी सांगितले.मे २०१२ नंतर पायाभूत रिक्त पदांवरील भरती झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. तर २००८ पासून २०११ पर्यंतच्या कालावधीतील सरकारमान्य वाढीव पदांवरील शिक्षकांना मान्यता मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचे वेतन अद्याप शिक्षकांच्या खात्यात जमा होत नाही. अशा शिक्षकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक