अकोला : शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:11 AM2018-02-03T02:11:33+5:302018-02-03T02:13:55+5:30

अकोला : शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन देणार्‍या शासनाचा निषेध करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता ‘जेल भरो’ आंदोलन केले. यावेळी निदर्शने करणार्‍या शेकडो शिक्षकांना रामदास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काहीवेळाने त्यांची सुटका केली. 

Akola: The Jail Bharo movement of teachers against the policy of anti-education policy | अकोला : शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

अकोला : शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पोलिसांनी ताब्यात घेऊन केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन देणार्‍या शासनाचा निषेध करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता ‘जेल भरो’ आंदोलन केले. यावेळी निदर्शने करणार्‍या शेकडो शिक्षकांना रामदास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काहीवेळाने त्यांची सुटका केली. 

शिक्षकांच्या आश्‍वासित व मान्य मागण्यांची पूर्तता तसेच अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शासनाने ठोस उपाययोजना केल्या नाही, तर येणार्‍या बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.  विजुक्टातर्फे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानितला त्वरित अनुदान सूत्र लागू करावे, वय ६ ते १८ च्या मुलांना दर्जेदार व मोफत शिक्षण द्यावे आणि अशैक्षणिक कामे बंद करावी, २३ ऑक्टोबर २0१७ चा आदेश त्वरित रद्द करावा, स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाला मान्यता देणे बंद करावे, कॅशलेस कार्डचे वितरण करावे, विद्यार्थी हितासाठी शिक्षक भरतीला परवानगी द्यावी, शाळांचे कंपनीकरण थांबवावे, नीट परीक्षेसाठी जिल्हानिहाय परीक्षा केंद्र द्यावे, रिक्त पदांवरील शिक्षक नियुक्तीला त्वरित मान्यता द्यावी, विनाअनुदानितकडील कायम शिक्षकांची अनुदानितकडे बदली, नियुक्ती झाल्यास, संस्था अनुदानावर आल्यास त्याच वेतनश्रेणीत मान्यता द्यावी, कायम शिक्षकांचा कार्यभार सलग तीन वर्षे २५ टक्केपेक्षा कमी होईपर्यंत त्याला अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रा. गणेश वानखडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. संतोष अहिर, प्रा. डी.एस. राठोड, प्रा. प्रवीण ढोणे,  प्रा. संजय गोळे, प्रा. अविनाश काळे, प्रा. श्रीराम पालकर,  प्रा. पंकज वाकोडे, इसारसिंग गिरासे, प्रा.  अनिल सेलकर, प्रा. अभय मोहोळे, प्रा. विठ्ठल पवार, प्रा. उन्हाळे, प्रा. रामेश्‍वर राठोड, प्रा. कैलास पवार, प्रा. प्रशांत मलिये, प्रा. संतोष अंधारे, प्रा. पंकज वाकोडे, प्रा. शकील हुसैन, प्रा. संतोष वाघ, प्रा. गुलवाडे, प्रा. सुनीता खेकाडे, प्रा. रफिक, प्रा. शे. उबेदउल्लाह जागीरदार यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. 

Web Title: Akola: The Jail Bharo movement of teachers against the policy of anti-education policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.