शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग महोत्सवाचे उद्घाटन, ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:29 PM

विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आले. विजयदुर्ग महोत्सवाची सुरूवात विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने करण्यात आली.

ठळक मुद्देविजयदुर्ग किल्ल्याला व विजयदुर्ग बंदर परिसर विद्युत रोषणाई विजयदुर्ग समुद्रावर वाळूमध्ये शिल्प, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

देवगड : विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर विजयदुर्ग बंदर अधिकारी गवार, विजयदुर्ग पोलीस अमोल चव्हाण, विजयदुर्ग सरपंच शितल पडेलकर, प्रसाद देवधर, ग्रामसेवक मुल्लांनी, विजयदुर्ग उपसरपंच महेश बीडये, पोलीस पाटील राकेश पाटील, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष यश वेलणकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष नितीन जावकर, सचिन खडपे, चंदू बीडये, शितल देवरकर, राजू परूळेकर, शैलेष खडपे, वर्षा गोखले, अविनाश गोखले, आनंद गोखले, प्रदिप साखरकर आदी उपस्थित होते.यावेळी जठार म्हणाले की, प्रमोद जठारांबद्दल लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ग्रीनरिफायनरी प्रकल्पामुळे जर कोकणचा ऱ्हास होणार असेल, येथील पर्यटनाला धोका पोहोचणार असेल, हा प्रकल्प खरच प्रदूषणकारी असेल, हा प्रकल्प ग्रीन नसेल तर माझाही विरोध असेल या बाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. 

या प्रकल्पाविषयी योग्य ती माहिती ग्रामस्थांनी प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. मी कोणी एंजट नाही. हे राज्य रयतेचे आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारकडून जी काही मदत करता येईल त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरूवात सर्वधर्मिय बांधवांनी प्रार्थना करून करण्यात आली. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष नितीन जावकर यांनी यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांना मंडळाने तयार केलेले विजयदुर्ग पर्यटनाची माहिती देणारे कॅलेंडर दिले.विजयदुर्ग येथे विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्यापाशी भव्य स्टेज उभारणी करण्यात आली असून तीन दिवस येथे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या महोत्सवात अनेक कलाकारांनी सुंदर अशा काढलेल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.विजयदुर्ग समुद्रावर वाळूमध्ये शिल्प काढण्यासाठी अनेक स्पर्धकांनी सुरूवात केली असून तीन दिवस येथे ही शिल्प काढली जाणार आहेत. विजयदुर्ग किल्ल्याला व विजयदुर्ग बंदर परिसर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूकविजयदुर्ग महोत्सवाची सुरूवात विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी विजयदुर्ग माध्यमिक शाळा, विजयदुर्ग प्राथमिक शाळा, विजयदुर्ग उर्दु शाळा या शाळेचे विद्यार्थी लेझिम पथकासह या मिरवणुकीत सामील झाले होते.

विजयदुर्ग प्राथमिक शाळेची मुले यावेळी ऐतिहासिक पोषाखात मिरवणुकीत सामिल झाली होती. यावेळी महिलांनी नववारी साड्या नेसून व फेटा बांधून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड