शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक, अपघात होण्याची दाट शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:45 IST

महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे.

ठळक मुद्दे पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक अपघात होण्याची दाट शक्यता

कणकवली : महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे. सिंधुदुर्गात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येऊन वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.महामार्गाचे चौपदरीकरण काम सध्या जोरदार सुरू आहे. सिंधुदुर्गातील खारेपाटण ते झाराप दरम्यान हे काम करण्यात येत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंची झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच मातीही खणण्यात आली आहे. २०१९ पर्यंत ७० टक्के काम करण्याचे आदेश कंत्राटदारांना असल्याने ते जोरदार कामाला लागले आहेत. पोकलेनच्या मदतीने रस्त्याच्या शेजारील टेकड्यांची माती काढली जात आहे.काही ठिकाणी महामार्गाच्या शेजारील भाग खोदून ठेवले आहेत. हे करताना पाणी जाण्यासाठी आवश्यक मार्ग ठेवण्यात आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतो. या मुसळधार पावसात टेकड्या तसेच उंच भागातील पाणी वाहून रस्त्यावर येत असते.

सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने चिखलाचे पाणी थेट रस्त्यावर येणार आहे. तसेच तो चिखल रस्त्यावर साचून राहण्याची भीती आहे. यासाठी पुढील पंधरा दिवसांत पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना न केल्यास ते चिखलमिश्रित पाणी महामार्गावर येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: दुचाकी चालकांना तर मोठा त्रास होणार असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या अपघातात जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या शक्यतांचा विचार करून प्रशासनाने पावसाळी नियोजन करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना त्वरित सूचना देणे आवश्यक आहे.

आता मे महिना संपत आला असून कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारणत: चार महिने जोरदार पडणाऱ्या पावसात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊसhighwayमहामार्ग