शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग  : शाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:12 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्या शैक्षणिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न ...

ठळक मुद्देशाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकरसावंतवाडीत शाळा नं. ४ चे भूमिपूजन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्या शैक्षणिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शाळा दुरुस्तीसाठी कधी नाही एवढा निधी दिला आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या झाराप येथील उपकेंद्रात कौशल्य विकासावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, माजी सभापती रवींद्र्र मडगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, विक्रांत सावंत, रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नगरसेवक दीपाली सावंत, उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, अ‍ॅड. पी. डी. देसाई, उमाकांत वारंग, अशोक दळवी, म. ल. देसाई, आनंद तळवणेकर, सुधन्वा आरेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना गोडसे, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी म्हणून आपण यशस्वी प्रयत्न करीत आहोत. शैक्षणिक दर्जा वाढवितानाच शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांनादेखील निधी दिला आहे.

चराठे येथील ओजस आंतरराष्ट्रीय शाळेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या झाराप उपकेंद्र्रस्थळी कौशल्य विकास शैक्षणिक उपक्रम हाती घेतला जाणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.सावंतवाडी नगरपरिषदेचे स्पर्धा परीक्षा केंद्र्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या केंद्र्रातून अधिकारी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या अद्ययावत केंद्र्रातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून सुमारे एक लाख घरात इंटरनेटची कनेक्शने दिली जाणार आहेत. त्यातून शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कौशल्य विकास शिक्षणासाठी सावंतवाडीत शंभर कोटींच्या गुंतवणुकीचे आयटी सेंटरदेखील उभारले जात आहे. शैक्षणिक प्रगती व्हावी आणि महिलांना रोजगार मिळावा म्हणून आपण उपक्रम हाती घेतल्याचे केसरकर यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, माजी सभापती रवींद्र्र मडगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी रेश्मा सावंत यांनी या शाळेच्या निधीसाठी आपण पालकमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली, असे सांगितले.सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. आपणास जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी याबाबत सांगितले आहे. त्यांच्यासह आपण जागेची पाहणी करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग