शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

 सिंधुदुर्ग : अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:16 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

ठळक मुद्देअतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करण्याची मच्छिमारांची भावनासिंधुदुर्गमधील १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीला संघर्षाची किनारमासेमारी अध्यादेशाच्या कठोर अंमलबजावणीची गरज, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा

सिद्धेश आचरेकर 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर किनारपट्टीला संघर्षाची किनार लाभली आहे. पारंपरिक मच्छिमार आणि यांत्रिकी मासेमारी यांच्यात गेले एक दशक तीव्र लढा उभा राहिला. मच्छिमारांच्या लढ्याला कालसापेक्ष राजकीय मंडळींनी पाठिंबा देत पाठीशी असल्याचे भासवले जाते.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती शासनाकडून राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांना आवर घालण्यात यश आले नाही. त्यामुळे शासनाने मासेमारी अधिनियम कायद्यात सुधारणा करून पर्ससीन व हायस्पीड मासेमारीवर कठोर पावले उचलली गेली पाहिजेत.अतिरेकी मासेमारी स्थानिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेत असल्याने पारंपरिक मच्छिमारांनी लढा उभा केला. न्यायासाठी आंदोलने केली. कधी कायदा हातात घेतला तर कधी कायद्याच्या धाकाखाली त्यांच्यावर बंधने लादण्यात आली. असे होत असताना परराज्यातील नौकाधारकांना मात्र सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धिंगाणा घालण्याची नामी संधी मिळाली.

मच्छिमारांच्या लढ्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे मच्छिमार लढ्याचे मोठे नुकसान झाले. आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल या भावनेतून मच्छिमार बांधव राज्यकर्त्यांवर अवलंबून राहिले. मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळवून देण्यास सत्ताधारी अपयशीच ठरले आहेत.मच्छिमार जेव्हा कायदा हातात घेण्याची भाषा करतात तेव्हा त्यांच्या संयमाचा अंत झालेला असतो. त्यांना मासेमारी व्यवसायाचे नुकसान करून आंदोलने करायची हौस नसते. तरी देखील प्रशासनाकडून सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करत असणाऱ्या नौकांवर कारवाई केली न गेल्यास संघर्ष पेटतो.

यात मच्छिमार समाज भरडला जातो. अशावेळी राजकीय नेत्यांना राजकारण करण्याचे आयते कोलीत मिळाल्यागत ते त्याचा बाऊ करतात. ह्यआमच्या लढ्याचे नेतृत्व कोणीही करा, पण आम्हांला अतिरेकी मासेमारीच्या जाचातून मुक्त करताना मत्स्य संपदेचेही संवर्धन कराह्ण, अशा भावना मच्छिमारांच्या झाल्या आहेत.चौकटअंमलबजावणीस चालढकलपणाकोकण किनारपट्टीवरील अतिरेकी मासेमारी रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभागाची मानसिकता दिसून येत नाही. मुख्यमंत्र्यांनी पारित केलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली गेल्यास परराज्यातील नौकांच्या घुसखोरीला चाप बसेल. मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन चालढकलपणा करून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप मच्छिमारांमधून होत आहे. सरकारने अनधिकृत मासेमारीवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी प्रशासनाची मानसिकता बदलणे आवश्यक बनले आहे.बैठका, आदेशांचे पुढे काय ?मच्छिमारांचा संघर्ष पेटल्यानंतर राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींकडून मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. अतिरेकी मासेमारी रोखण्यासाठी बैठका घेतल्या जातात. मंत्री संबंधित विभागाला कारवाईचे आदेश देतात. यातून मच्छिमारांना त्यावेळी दिलासा मिळतो.सरकारकडून ठोस काहीतरी उपाययोजना केल्या जातील, अशी आशा वाटू लागते. पण असे काहीच न होता मच्छिमारांच्या पदरात निराशाच पडते. केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे एलईडी मासेमारी व हायस्पीडबाबत उच्चस्तरीय बैठक झाली होती.यात मत्स्य विभागासह कोस्टगार्ड विभागाला कारवाई करण्याच्या सूचना होत्या. तर राज्याचे पर्यावरण मंत्री, मत्स्योद्योगमंत्री यांचेही लक्ष वेधून कारवाईच्यावेळी प्रशासन कमी पडत आहे. येणाऱ्या काळात मच्छिमारांना जे नेते न्याय मिळवून देतील, तसेच मासेमारी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडतील, त्यांच्याच मागे मच्छिमार समाज राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार