सिंधुदुर्ग : कोनशी-रायावाडी येथील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी, घराच्या पडवीत शिरुन हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 11:43 IST2017-12-20T11:37:25+5:302017-12-20T11:43:01+5:30

बांदा: कोनशी-रायावाडी येथील सुरेश विष्णू नाईक यांच्यावर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत त्यांच्या मानेचा चावा घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झालेत. भक्ष्याच्याशोधार्थ पडवीत घुसलेल्या बिबट्याला सुरेश नाईक हे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बिबट्याने आक्रमक होत त्यांच्यावरच प्रतिहल्ला केला.

Sindhudurg: A farmer of Konshi-Rayawadi, who was injured in a leopard attack, was attacked in the house | सिंधुदुर्ग : कोनशी-रायावाडी येथील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी, घराच्या पडवीत शिरुन हल्ला

कोनशी-रायावाडी येथील सुरेश नाईक

ठळक मुद्देभक्ष्याच्या शोधार्थ पडवीत घुसला बिबट्याकोनशी-रायावाडी येथील सुरेश नाईक यांनी केला हुसकावण्याचा प्रयत्न बिबट्याने आक्रमक, त्यांच्यावरच केला प्रतिहल्ला मानेचा चावा घेतल्याने नाईक गंभीररित्या जखमी

बांदा: कोनशी-रायावाडी येथील सुरेश विष्णू नाईक यांच्यावर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत त्यांच्या मानेचा चावा घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झालेत.

भक्ष्याच्या शोधार्थ पडवीत घुसलेल्या बिबट्याला सुरेश नाईक हे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बिबट्याने आक्रमक होत त्यांच्यावरच प्रतिहल्ला केला. त्यांना तातडीने सरपंच सुभाष सावंत यांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

यावेळी वनखात्याचे अधिकारी देखिल उपस्थित होते. घराच्या पडवीत शिरुन शेतक-यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा वनखात्याने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Sindhudurg: A farmer of Konshi-Rayawadi, who was injured in a leopard attack, was attacked in the house