सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे उंबर्डे मार्ग तासभर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:13 IST2018-06-08T16:13:41+5:302018-06-08T16:13:41+5:30
वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडीनजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे गुरुवारी सकाळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक व ग्रामस्थांनी एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीद्वारे पूर्ण झाड हटवून दुपारी एकच्या सुमारास मार्ग सुरळीत केला.

मुसळधार पावसामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडीनजीक झाड उन्मळून पडले.
वैभववाडी : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडीनजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे गुरुवारी सकाळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक व ग्रामस्थांनी एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीद्वारे पूर्ण झाड हटवून दुपारी एकच्या सुमारास मार्ग सुरळीत केला.
पावसाची ११४ मिलीमीटर नोंद झाली असून यंदाच्या सरासरीत वैभववाडीने अन्य तालुक्यांना मागे टाकले आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास कुसूर पिंपळवाडीनजीक आकेशियाचे झाड पडल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने वाहनचालकांनी झाडाचा अर्धा भाग तोडून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने झाड पूर्णपणे हटवून मार्ग सुरळीत केला.